दर्यापूर रोड ते सिरसो रोडवर गतिरोधक लावा… युवा सेने तर्फे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा…
हरीष गाठेकर
तालुका प्रतिनिधी मुर्तिजापूर (अकोला)
मुर्तिजापूर:- दि:१९- काही दिवसापूर्वीच मुर्तिजापूर ते दर्यापूर या रोड मार्गाचे काम पार पडले. परंतु रस्ता बांधते वेळीं आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर (गतिरोधक) ची बांधणी न केल्यामुळे वाहने भरधाव वेगाने चालत असल्याने वारंवार अपघात होत आहेत.आणि लोकांचे प्राण जात आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून या वर्षी मुर्तिजापूर ते दर्यापूर रस्त्याचे काम करण्यात आले. नाका नंबर ७. पासून व पुंडलिक महाराज मंदिर तसेच सिरसो फाटा ही जी अपघात प्रवण क्षेत्र आहेत इथे गतिरोधक ची फार आवश्यकता आहे. भविष्यात मोठा अपघात घडू नये म्हणून काल युवा सेनेतर्फे लव करात लवकर गतिरोधक बांधण्याची विनंती युवा सेने तर्फे करण्यात आली.नाहीतर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.यावेळेस युवासेना तालुका सचिव अक्षय लकडे, मयुर गावंडे,धीरज उमाळे, हर्षद ठोकळ, अर्पित गावंडे इत्यादी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते..











