ताज्या घडामोडी

स्वाधीन बहुद्देशीय संस्था पार्डी ह्यांच्या वतीने लोक कलावंताचा बौद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ समारोह निमित्त सन्मान.

अविनाश पोहरे – संपादक


पातूर तालुक्यातील ग्राम पार्डी येथे बौद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे वाचन वैशाखी पौर्णिमेनिमित्त ठेवण्यात आले होते त्याचा समारोह पर कार्यक्रम 8 नोव्हेंबर रोजी पार पडला असून बौद्ध उपासक गुलाबराव दगडुजी हिवराळे ह्यांनी वाचन केले व त्याच अनुषंगाने संगीत वाद्य च्या माध्यमातून समाजप्रबोधन करून आपली कला सादर करणाऱ्या लोक कलावंताचा स्वाधीन बहुद्देशीय संस्था पार्डी ह्यांच्या वतीने 30 कलावंतांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ह्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा विद्या भारत आकोडे व सचिव निलेश गुलाबराव हिवराळे ह्यांनी सर्वांना सन्मानपत्र दिले.व सर्व कलावंतांनी आपली कला सादर करून कार्यक्रमामध्ये उत्साह निर्माण केला त्याबद्दल सर्व कलावंतांचे पार्डी येथील गावकऱ्यांच्या वतीने आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक नवयुवक मंडळ पार्डी ह्यांनी अथक परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: