‘एक हात मदतीचा’ निराधार वृध्दांसोबत दिवाळी

अविनाश पोहरे – संपादक
अकोला दि- ११ नोव्हे- डेमोक्रँटिक पार्टी आँफ इंडिया, गुरुदेव विचारमंच अकोट व नेहरु युवा केंद्र अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवापुर येथील मातोश्री वृध्दाश्रमात ‘एक हात मदतीचा’ या माणुसकीच्या दृष्टिकोनातून सामाजिक वसा जपत येथील वृध्दांना फराळ, स्वेटर व ब्लँकेट चे वाटप करीत दिवाळी साजरी करण्यात आली.यावेळी डि.पी.आय विदर्भ अध्यक्ष प्रा. अविनाश पवार, गुरुदेव विचार मंचचे अध्यक्ष शिवकुमार राऊत, डी.पी.आय. युवक आघाडी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अमोल भटकर, कवी,गीतकार व समाजसेवक गणराज मधू तसेच समता परिषदेचे जिल्हा सदस्य डाँ.विजय इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.
देशात वृद्धाश्रमाची संख्या का वाढत आहे तर आम्ही शिक्षण खूप घेतल पण संस्कार घेतले नाहीत म्हणून आज उच्च शिक्षित लोकांचे आई वडील सुद्धा वृद्धाश्रमात दिसतात. जिवापाड प्रेम करणारी आई वडील आम्ही आमच्या घरी न ठेवता वृद्धाश्रमात त्यांना पाठवतो हे चित्र बदलण्यासाठी तरुणाईला जागृत करुन समाज जागृती करावी लागेल त्या शिवाय पर्याय नाही. असे विचार यावेळी प्रा. प्रशांत महाराज ठाकरे यांनी व्यक्त केले.
समाजात आजही अनेक गरजू लोक आहेत.त्यांना मदतीची गरज असुन आपण अशा निराधार लोकाना मदत केली तर ते फार मोठं पुण्य कार्य ठरेल,असं मत डॉ रामेश्वर बरगट यांनी यावेळी व्यक्त केलं.
आम्ही सर्व तरुणांनी समाजात आव्हान केले की या उपक्रमात आम्हाला मदत करा. या हाकेला ओ देत अनेक मदतीचे हात पुढे आले.अनेक लोकांनी, संघटनांनी,आम्हाला तण, मन, धनाने सहकार्य केले. त्यामुळेच आम्ही या निराधार वृद्धांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकलो. या अनमोल कार्यात त्यांनी जी साथ दिली ती खरच वाखाणण्याजोगी आहे. हा उपक्रम दरवर्षी आम्ही आयोजित करत असुन पुढच्या वर्षी सुद्धा हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर साजरा करु.असे विचार गुरुदेव विचार मंचचे अध्यक्ष व आयोजक शिवा राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.डी.पी.आय. विदर्भ अध्यक्ष प्रा. अविनाश पवार यांनी देखील यावेळी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवा राऊत यांनी केले. संचलन सचिन माहोकार यांनी तर आभार प्रदर्शन वैभव नायसे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गजानन कुटेकर, गोपाल वानखडे,गणेश पडोळे,माधवराव सावरकर, लक्ष्मीनारायण जोशी, निखिल कुलट,शितल ठाकरे,शुभांगी लाहोळकर,वैष्णवी गोतमारे,आचल टिकार,काजल मोरे यांनी विशेष प्रयत्न केले.तसेच आर्थिक योगदान दिले.