ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या पाल्यांना नि:शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहूद्देशिय संस्थेचा अभिनव उपक्रम.

अविनाश पोहरे – संपादक

पातूर :- कोरोना सारख्या महामारी मध्ये खचलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना तसेच नुकत्याच झालेल्या ओल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे खूप नुकसान झाले आहे. व कोरोना सारख्या महामारी मुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे. त्याचा दुष्परिणाम आज आपल्याला दिसत आहे.त्यामुळे सामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली दिसत आहे. एवढंच नाही तर यावर्षी सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आपल्याला दिसत आहे म्हणून ही बाब लक्षात घेता त्यांच्या पाल्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर घेण्यात येत आहे.तसेच येणाऱ्या दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुलांना सुद्धा मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेता येइल. एवढंच नाही तर 26/11 मुंबई हल्ल्याची आठवण लक्षात घेता सैनिकांच्या मुलांना सुद्धा लाभ घेता येइल. तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती मधील मुलां -मुलींना शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे ही बाब लक्षात घेत पातूर (नानासाहेब) मध्ये मागील दोन वर्षापासून द प्रोफेशनल अकॅडमी बहूद्देशिय संस्था, पातूर चे संचालक प्रा पंकज पोहरे हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतात, यांनी सामाजिक संवेदनाचा परिचय देऊन शेतकऱ्यांच्या मुलांना निशुल्क स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण चे आयोजन केले आहे.
या स्पर्धा परीक्षेचे तीन महिन्याचे मोफत रोज एक तास निशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. या निशुल्क प्रशिक्षणा चा पूर्ण लाभ घ्यावा. त्याकरिता दोन पासपोर्ट फोटो, दिव्यांग प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा पुरावा सोबत आणावा. प्रशिक्षण ठिकाण पातूर (नानासाहेब ) डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय जवळ टी. के. व्ही चौक तिसरा मजला द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहूद्देशिय संस्था, पातूर येथे प्रशिक्षण देण्यात येइल. सदर प्रशिक्षण येत्या 1 डिसेंबर 2020 पासून देण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी 8669736994 यावर संपर्क साधावा.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: