ताज्या घडामोडी

शिवसहकार सेना व भारतीय विमा कर्मचारी सेनेतर्फे नवी मुंबईत दिवाळी खाद्यपदार्थ वाटप.

अनंतकुमार गवई
नवी मुंबई, प्रतिनिधी :

शिवसहकार सेना व भारतीय विमा कर्मचारी सेना ( नॅशनल यूनीट ) यांच्या संयुक्त विध्यमाने सालाबादप्रमाणे यावर्षी दिवाळी निमित रवा, मैदा, तेल, तूप, साखर, पोहे, तांदूळ व इतर खाद्यपदार्थाचे वाटप केंद्राचे उद्घाटन नुकतेच समाजमंदिर हॉल, इंदिरानगर, नवी मुंबई मोठया उत्साहात पार पडला .
नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख व शिवसहकार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस अँड. मनोहर गायखे यांच्या माध्यामातून गेली पंचवीस वर्षे सातत्याने विविध आदिवासी पाडे झोपडपट्या येथील विधवा, अंध इ. गरजूस दिवाळीसाठी पदार्थाचे वाटप करण्यात येते, हा उपक्रम सानपाडा, तुर्भे, नेरुळ, कोपरखैरणे, येथील गरजूसाठी सुद्धा राबवील जाणार आहे. नुकत्याच  झालेल्या उपक्रमांचा लाभ ४५० गरजूनी घेतला. या उद्घाटन प्रसंगी शिवसहकार सेनेचे नवी मुंबई संघटक   गणेश डोमसे, भारतीय विमा कर्मचारी सेनेचे कार्यकारी चिटणीस संजय डखळ, शिवसेना विभागप्रमुख महेश कोटीवाले, शिवाजी मोरे, उपशहर प्रमुख महेश खैरनार उत्तर भारतीय संघाने प्रमुख कमलेश वर्मा, हेमंत जैस्वाल, प्रकाश पाल, निशाद म्हात्रे, पाटील, गावडे व शेकडो शिवसैनिक उपस्थिती होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: