ताज्या घडामोडी

डॉ.संदीप सुशिर यांची जय महाराष्ट्र पत्रकार महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

आकाश मुंदाणे
अमरावती ग्रामीण जिल्हाप्रतिनिधी

दर्यापूर :- नारायण नगर दर्यापूर जिल्हा अमरावती येथील रहिवाशी व विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व कोरोना योद्धा असे अनेक नामवंत पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यामध्ये सदैव तत्पर असलेले तसेच पशुवैद्यकीय सेवा पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करणारे समाजसेवक,पत्रकार,गोसेवक डॉ.संदीप सुशिर यांचा महाराष्ट्रातील सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांची जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी 1 नोव्हेंबर 2020 ते 1 जानेवारी 2020 या कालावधी करिता महासंघाचे सर्व कार्यकारी मंडळ व सदस्य यांच्यावतीने महासंघाचे अध्यक्ष प्रकाश जाधव व पत्रकार महासंघाचे संस्थापक सदस्य सुरज भोइर यांच्या हस्ते निवड करण्यात आली असून डॉ.संदीप सुशिर यांना पुढील वाटचालीसाठी व सामाजिक कार्याकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कार्यरत असलेला व सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळे सामाजिक कार्य करणारा जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघ सदैव तत्पर असतो. डॉ.संदीप सुशिर यांच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवडी बद्दल सर्वच स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: