सौ.पुष्पाताई मेघे यांचा वाढदिवस सामाजिक भावनेतून संपन्न

अनंतकुमार गवई
नवी मुंबई :-
नवी मुंबईतील श्रीमती राधिकाबाई मेघे मेमोरियल शिक्षण संस्था,ऐरोली यासंस्थेच्या विश्वस्त तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांची मातृतुल्य ,वात्सल्य मुर्ती म्हणून ख्याती असलेल्या सौ. पुष्पाताई मेघे यांचा वाढदिवस हा विविध उपक्रमाचे आयोजन करून सामाजिक कृतज्ञतेतून संपन्न झाला.
यावेळी श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयातील माळीपदावर कार्यरत असलेले संदिप काळभोर यांचा मोटार सायकल घसरून अपघात झालेल्या या कर्मचाऱ्यांला वैद्यकीय उपचारासाठी रोख स्वरूपात (६७,४००/-) सदुसष्ट हजार चारशे रूपयांची मदत करण्यात आली. करोनोच्या महामारीच्या काळात संदिप काळभोर यांची बेताची आर्थिक परिस्थिती व वैद्यकीय उपचाराचा खर्च यामुळे त्यांच्या परिवारवर आलेल्या संकटात श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयातील सर्वं कुटुंबसदस्यांने सामाजिक दायित्वाच्या भुमिकेतून कर्मचाऱ्यांच्या आपत्तीजन्य संकटकाळात भावनिक व आर्थिक मदतीचा भार उचलला .तसेच सौ.पुष्पाताई मेघे यांचा वाढदिवसांचे औचित्य राखून संदिप काळभोर यांच्या मुलीची पदवीत्तर शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून असे श्रीमती राधिकाबाई मेघे विद्यालयाचे प्राचार्य अरूण जोशी यांनी जाहीर केले.
माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या मार्गदर्शनाने सौ. पुष्पाताई मेघे गेली अनेक वर्षापासून शैक्षणिक , सामाजिक व महिला समक्षीकरण क्षेत्रात कार्यरत आहे. भविष्यात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे आयोजन अरूण जोशी (प्राचार्य ,मराठी माध्यम विभाग )अलका जाधव (प्राचार्या,इंग्रजी माध्यम विभाग )व सौ.सायली गोरे (मुख्याध्यापिका,मराठी प्राथमिक विभाग ) यांनी केले असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे लेखापाल सुरेश राऊत, संगणक विभाग प्रमुख सचिन डेंगळे , सहशिक्षक संदिप बहाडकर यांनी विशेष मेहनत घेतली.