ताज्या घडामोडी

मुंबई छात्रभारतीचा एनएसएस पुरस्कार सोहळा संपन्न..

अनंतकुमार गवई
मुंबई
छात्रभारती विद्यार्थी संघटना आयोजित एनएसएस अॕवाॕर्ड २०१९-२० पुरस्कार वितरण सोहळा आज प्रसिध्द नेत्र शल्यचिकित्सक पद्मश्री डाॕ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते जे.जे.हाॕस्पिटल भायखळा येथे संपन्न झाला.
मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या ९० महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता या सर्व स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकाऱ्यांमधील सर्वोत्कृष्ट ६ स्वयंसेवक अनुक्रमे निखिल धुळणकर,पुजा देवाडिगा,अनिकेत कांबळे,यश मोरये,अंकित शर्मा , साईराज शेट्टी व २ कार्यक्रम अधिकारी अनुक्रमे डाॕ. लक्ष्मण राठोड व प्रा.विजय विश्वकर्मा यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच किर्ती महाविद्यालय दादर व एस.एम.शेट्टी महाविद्यालय,पवई या दोन महाविद्यालयंना विभागुन सर्वोत्कृष्ट एनएसएस युनिट पुरस्काराने सन्मानित केले.
तद्प्रसंगी छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले व पदाधिकारी विकास पटेकर,दीपक भानवसे,स्मिता भोसले,निलेश झेंडे, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेश किर्दकुडे व सर्व पुरस्कार प्राप्त एनएसएस
स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: