ताज्या घडामोडी

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार : बाळापूर पातूर रोड वरील घटना

नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी बाळापूर

बाळापूर पातूर रोडवर दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता च्या सुमारास मांडवा फाटा समोर बागफाट्याच्या अलीकडे टर्निंग वरील पुलाजवळ रस्ता क्रॉस करतांना अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांनी बाळापूर पोलीस स्टेशन येतात घटनास्थळी बाळापूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नितीन शिंदे व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बिबट्या चा मृत्यू झाला होता. त्यांनी तात्काळ अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कर्यालय अकोला यांना कळविले असता वन विभागाचे आर.एन. ओवे यांच्यासह वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली यांनी घटनेचा पंचनामा करून सदर मृतक बिबट्याला अकोला वनपरिक्षेत्र येथे घेऊन गेले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: