ताज्या घडामोडी

शहिद जवान कुटूंबीयांना जमीन देण्यासंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात शुद्धीपत्रक काढणार…ना.बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य

अविनाश एस. पोहरे – संपादक

शहिद जवान कैलास निमकंडे यांच्या कुटुंबीयांना ग्रामपंचायत शिर्ला येथील गट क्रमांक ७३ येथील पाच एकर जमीन लवकरात लवकर मिळाली पाहिजे यासाठी दिनांक ०४ नोव्हेंबर २०२० ते ०६ नोव्हेंबर २०२० असे तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आमरण उपोषण करण्यात आले होते.निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे , उपजिल्हाधिकारी महसूल बाळासाहेब गाढवे , ना.बच्चूभाऊ कडू यांचे विषेश कार्य अधिकारी प्रा.प्रकाश अंधारे , उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी , पातुर तहसीलदार दिपक बाजड , त्रिदल सैनिक सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेजर संदीप लगड आणी उपोषणकर्ते पातुर विकास मंचचे संयोजक तसेच सामाजिक कार्यकर्ते ठाकुर शिवकुमारसिंह बायस व वीरपिता काशीराम निमकंडे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उपजिल्हाधिकारी व ना.बाळासाहेब थोरात महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या लेखी आश्वासनानंतर ठाकुर शिवकुमारसिंह बायस व वीरपिता काशीराम निमकंडे यांनी उपोषण सोडले होते.त्यानुसार मंगळवार दिनांक १० नोव्हेंबर २०२० ला ना.बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी यांचे लेखी आश्वासन पत्र मंत्रालय मुंबई येथे त्यांच्याकडे घेऊन येण्यास सांगितले होते.करीता उपोषणकर्ते ना.थोरात यांना भेटले व त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली.ना.थोरात यांनी येणा-या हिवाळी अधिवेशनात तसे शुद्धीपत्रक काढून त्याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील सर्व शहिद जवान यांच्या कुटुंबीयांना करून देवू असे आश्र्वासन दिले.यासोबतच पातुर शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश गाडगे यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्या प्रस्तावाप्रमाणे पातुर नगरपरिषदची हद्दवाढ वाढ व्हावी याचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर हद्दवाढ करावी अशी मागणी केली. त्यावर त्यांनी पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघ यांच्या निवडणुकीची लागलेली आचारसंहिता संपल्यावर याविषयी उचित योग्य निर्णय घेवू असे सांगितले.यावेळी महसूल व वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य नितिन करीर व विधी व न्याय विभागाचे अप्पर मुख्य सचिव रा.ना.लढ्ढा यांच्याशी उपोषणकर्ते शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेवून याविषयी सविस्तर माहिती अवगत करून देवून सकारात्मक चर्चा केली.त्यांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांप्रती चांगली आदरभावना व्यक्त करत यावर योग्य मार्ग काढून त्यांना लवकर न्याय देऊ असे सांगितले आहे.याप्रसंगी उपोषणकर्ते ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांच्या शिष्ठमंडळात माजी सैनिक तसेच विदर्भ त्रिदल सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष संतोष च-हाटे , भाजपा उपाध्यक्ष पातुर गणेश गाडगे , मेजर विलास निमकंडे , रितेश सौंदळे हे मान्यवर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: