ताज्या घडामोडी
विना परवाना रेती वाहतूक तहसीलदार बाळापूर ह्यांची खडक कारवाई

भिमकिरण दामोदर ग्रामीण प्रतिनिधी हाता
बाळापूर चे तहसीलदार डी एल मुकुंदे यांनी तालुक्यातील ग्राम सोनाळा येथे रेतीची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले एम एच 30जी 2973 क्रमांकाचे टँकटर मध्ये 1 ब्रास रेती आढळून आली असता प्रकरणी सारंगधर अरबट यांचे वाहन जप्त करण्यात आले यावेळी केलेल्या कारवाई वेळी तहसीलदार डी एल मुकुंदे सोबत मंडळ अधिकारी गजानन फिरके तलाठी सतिष कराड महसूल कर्मचारी नागेश गिरी व चालक अंबादास कनहेरकर उपस्थित होते
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.