पातूर पर्यटन क्रेंद्रात अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास

पक्षी सप्ताहानिमित्त 45 पक्ष्यांची नोंद
अविनाश एस. पोहरे – संपादक
पातूर : वनविभागांतर्गत सुरु असलेल्या पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने रविवारी पातुरच्या पर्यटन केंद्रात पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन केंद्रात 45 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे तर अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा अधिवास या भागात असल्याचे निरीक्षणात आढळून आले आहे.
डॉ. सलीम अली आणि मारुती चित्तमपल्ली यांच्या जयंती निमित्त राज्यभरात वनविभागाने पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पातूर वनविभागांतर्गत दि 5 नोव्हेंबर पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार 8 नोव्हेंबर रोजी रविवारी पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षी तज्ज्ञ दीपक जोशी यांनी परिसरातील पक्ष्यांची माहिती दिली. यावेळी निरीक्षण दरम्यान पांढऱ्या पोटाचा कोतवाल, सोनेरी पाठीचा सुतार, बंटिंग, रेड हेडेड बंटिंग यासारखे अनेक दुर्मिळ पक्षी आढळून आले. तर विविध प्रजातीचे 45 पक्ष्यांची यावेळी नोंद करण्यात आली.यांनतर समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्य्क उपवनसंरक्षक पडगव्हाणकर साहेब हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षीतज्ज्ञ दीपक जोशी उपस्थित होते. तर वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, सरपंच सौ. जयश्री घुगे, पोलीस पाटील रुस्तमराव घुगे, उपसरपंच मधुकर आडे, पर्यटन समिती अध्यक्ष शिवाजीराव घुगे, किड्स पॅराडाईजचे संस्थापक गोपाल गाडगे, डॉ. महाशब्दे, डॉ. अडगावकर, डॉ. मुंदडा, डॉ. भारती, डॉ. मोरे, डॉ.काळे, वनरक्षक अविनाश घुगे आदी मान्यवर प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. प्रास्तविक वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक उपवनसंरक्षक पडवळकर साहेब यांनी अध्यक्षीय भाषण केले. संचालन व आभार वनपाल कु. धुमाळे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला पातुर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी लसनकर मॅडम यांच्यासह निसर्गप्रेमी यांची उपस्थिती होती.