गाडेगांव ग्रामपंचायत च्या विशेष ग्रामसभेत गुप्त मतदान ठरवणार सरपंचाचे भवितव्य :-अविश्वास ठरावास जिल्हाधिकारी यांचे स्थगिती प्रकरण
गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत गाडेगांव प्रमोद ज्ञानदेव वाकोडे यांचे विरुद्ध ग्रा.पं.च्या
विजय सदाशिव बोर्डे.लक्ष्मण रामराव काळे.अरविंद गजानन वानखडे. मंगला दिनेश गवई.किर्ती पद्माकर पिंगळे.माधुरी संजय वडतकार.शारदा गोकुळ हिंगणकार सात सदस्यांनी १९/१०/२०२० रोजीच्या ग्रामपंचायत गाडेगांव च्या विशेष सभेमध्ये अविश्वासाचा ठराव पारित केला होता. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं. गाडेगांव यांनी सरपंच या पदाचा रिक्त पदाचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविला होता. प्रमोद ज्ञानदेव वाकोडे यांनी १९/१०/२०२० रोजीच्या अविश्वास ठरावास दि.०४/११/२०२० रोजी जिल्हाधिकारी अकोला यांच्या न्यायालयात आव्हान दिले होते .त्यानंतर दि.२८ आक्टो २०२० च्या शासन निर्णयानुसार थेट निवडून आलेल्या सरपंच यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पारित झाल्यानंतर ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे.त्यामुळे दि.०४/११/२०२० रोजी प्रमोद ज्ञानदेव वाकोडे यांनी जिल्हाधिकारी,अकोला यांच्या न्यायालयात विशेष सभा ही तहकूब करा विनंती अर्ज नामंजूर करून प्रार्थना अर्ज मंजूर करून १९/१०/२०२० रोजीच्या विशेष सभेमध्ये पारित झालेला सरपंच ग्रा.पं.गाडेगांव यांचेविरुद्धचा अविश्वासाचा ठराव गाडेगांव ग्रामपंचायत ची ग्रामसभा होऊन त्यावर निर्णय होईपर्यंत सरपंचा विरुद्धचा अविश्वासाच्या ठरावास स्थगिती दिली व विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येऊन त्यात ग्रामपंचायती द्वारे पारित झालेल्या अविश्वास ठरावाला ग्रामसभेसमोर ठेऊन गुप्त मतदानाद्वारे पारित झालेल्या अविश्वासाच्या ठरावाला ग्रामसभेसमोर ठेवून गुप्त मतदानाद्वारे या अविश्वासाच्या प्रस्तावावर चर्चा घडवून त्याबाबत ग्रामसभेचा निर्णय प्राप्त करून घ्यावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना दिले. या प्रकरणी सर्व गाडेगांव नागरीकांचे लक्ष विशेष ग्रामसभे कडे लागले आहे तरी लवकर ग्रामसभा घेऊन गाडेगांव येथील विविध समस्या मार्गी लावण्यात यावे अशी मागणी गाडेगांव वासी करीत आहे












