मालेगाव येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा येथे दिवाळी उत्सवाचे आयोजन
अजय चोथमल प्रतीनीधी मेडशी
दि. 18. मालेगाव येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र मालेगाव च्या वतीने दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी दिवाळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मा कुमारी स्नेहल लतादीदी होत्या कार्यक्रमाची सुरुवात मुरलीने झाली त्यानंतर सुंदर डान्स करून मान्यवरांचे स्वागत केले कु.पुजा हिने माता लक्ष्मीच्या वेशात पदार्पण करताचं उपस्थित साधकांनी फुलांची उधळन केली .आरती नंतर दिवाळी सणाचे अध्यात्मिक महत्व या विषयावर दिदींनी मार्गदर्शन केले सर्वांना दिवाळी सणाचा फराळ देण्यात आला यावेळी मालेगाव शहरासह खेड्यापाड्यातून अनेक साधकांनी उपस्थिती दर्शविली होती आत्म्याच्या उन्नतीसाठी आत्मिक ज्योत प्रज्वलित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी ब्रह्माकुमारी द्वारा सुरू असलेले ईश्वरीय कार्य आणि या कार्यामध्ये सामील होण्याचे आवाहन दिदींनी केले सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली











