ताज्या घडामोडी

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पातूर येथे पत्रकारांचा केला सन्मान

प्रहार बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

अविनाश पोहरे – संपादक

16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने पातुर येथील पत्रकार बांधवांचे प्रहार बहुउद्देशीय संस्था चे वतीने स्थानिक कलाश्री डिजिटल फोटो स्टुडिओ चे सभागृहांमध्ये गुलाब पुष्प देऊन तसेच कॅलेंडर वही आणि लेटर बुक देऊन सन्मान करण्यात आला.समाजामध्ये सम विषम परिस्थितीचा सामना करीत इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया पत्रकार बांधव यांचे कार्य प्रत्येक बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने फार मोलाचे आहे याकरता आजच्या दिवशी त्यांचा सन्मान करणे हे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण समजून प्रहार बहुउद्देशीय संस्थेने त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेऊन येथील कलाश्री डिजिटल फोटो स्टुडिओमध्ये 16 नोव्हेंबर सोमवार रोजी प्रहार सेवक अमोल करवते यांनी पत्रकार बांधवांना आमंत्रित करून त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा गुलाब पुष्प देऊन, वही ,कॅलेंडर देऊन सन्मान केला.यावेळी पातुर तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष देवानंद गहिले ,पातूर तालुका सचिव प्राध्यापक सी. पि. शेकुवाले,पातूर तालुका पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष संतोष कुमार गवई,पत्रकार संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख अविनाश पोहरे,तसेच श्रीकृष्ण शेगोकार राम वाडी,कलाश्री स्टुडिओ चे संचालक आणि पत्रकार संघाचे छायाचित्रकार सतिष कांबळे आदींचा याठिकाणी सत्कार करण्यात आला आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: