ताज्या घडामोडी

वाढदिवस साजरा न करता निराधार कुटुंबासोबत केली कृष्णा बोबटकार यांनी दिवाळी साजरी

गरजू लोकांना ब्लॅंकेट, साडी चोळी, कापड साहित्य आणि मास्क वाटप करून गोरगरीब जनतेसोबत दिवाळी साजरी

आई तुळजाभवानी मित्र मंडळ गुरुवार पेठचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोंबटकार यांचा सामाजिक उपक्रम

अविनाश एस. पोहरे – संपादक

पातुर येथील आई तुळजाभवानी मित्र मंडळ गुरुवार पेठ चे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा बोंबटकार यांनी आपला वाढदिवस कोरोणाचा काळात गोरगरीब जनतेमध्ये साजरा केला गरजू लोकांना आर्थिक मदत केली सोबतच गरजू लोकांना ब्लॅंकेट साडी चोळी कापड साहित्य आणि मास्क वाटप करून गोरगरीब जनतेस सोबत दिवाळी साजरी केली यावेळी त्यांनी सर्वांना फराळाचे साहित्य देऊन त्यांच्यासोबत सुखदुःख अशी चर्चा केली सर्व प्रथमच गावांमध्ये हा उपक्रम कृष्णा बोंबटकार यांनी केल्याने त्यांचा एक आदर्श या गावात निर्माण झाला आहे यावेळी कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले, समाजसेवक गजानन गाडगे, गुरुवार पेठ मधील समाजसेवक दिगंबर बंड, सचिन गिऱ्हे , दि प्रोफेशनल करिअर अकॅडमी संस्थापक अध्यक्ष पंकज पोहरे, गणेश तायडे ,आकाश इंगळे ,दत्ता पांडे ,देवा यशवंतराव दीपक सदर ,रोशन तायडे,अतुल भांगे ,प्रतिक गाडगे ,पप्पू गवई, आदी सह इतर मान्यवर उपस्थित होते कृष्णा बोंबटकार यांनी 18 नोव्हेंबर बुधवारी पातुर नवीन बसस्थानक , बायपास झोपडपट्टी, हिंदू स्मशानभूमी पातुर जुने बस स्थानक या ठिकाणी हा अभिनव उपक्रम राबवून युवकांच्या समोर आदर्श उभा केला आहे या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: