ताज्या घडामोडी
माजी आमदारांची मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण अकोला यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या वर केली चर्चा.
नितीन हुसे
तालुका प्रतिनिधी बाळापूर
बाळापुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार, बळीराम भाऊ सिरस्कार यांनी मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण अकोला यांची भेट घेऊन, बाळापुर शहरातील कासारखेड विभागातील वैभव पांडुरंग रोकडे या शेतकऱ्याची शेतात लावलेल्या अवैध विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन, त्यांचा मृत्यू झाला असता, त्यांच्या मदती करता त्यांच्याकडे मागणी केली.तसेच वारंवार होणारा वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास होत असल्या मुळे वीज पुरवठा सुरळीत करणे बाबत मागणी केली.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.











