ताज्या घडामोडी

बाळापूर च्या ऐतिहासिक किल्ल्याला विकसित करून पर्यटनाला चालना द्या…

ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांची मागणी

किरण कुमार निमकंडे
संपादकीय सदस्य
अकोला एक्सप्रेस न्युज

भारतातील महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यात बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे हे शहर मन आणी महेश या दोन नदी तीरावर वसलेले प्राचीन काळापासून मोठी बाजारपेठ असलेले एक ऐतिहासिक शहर आहे.
या शहरात इ.स.१७०० च्या दशकात त्यावेळच्या शासनकर्त्यांनी खुप सुंदर असा भुईकोट किल्ला उभारला.
आज पिढ्यानपिढ्या तो किल्ला आपल्या इतीहासाची साक्ष देत आजही डौलदार पणे उभा आहे.परंतु याची खुप दयनीय अवस्था झालेली आज आपल्या निदर्शनास येत आहे.त्यामध्ये महत्वाची अशी शासकीय कार्यालय अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत त्यामध्ये उप विभागीय अधिकारी कार्यालय , तहसिल कार्यालय , पंचायत समिती , ट्रेझरी कार्यालय यांचा समावेश आहे.या सर्व कार्यालयासाठी शासनाने इतर दुस-या ठिकाणी जागा पाहून त्या कार्यालयासाठी प्रशस्त अशी शासकीय इमारत बांधून तेथे स्थलांतर केले जावे व त्या किल्ल्याला विकसित करून पर्यटनाला चालना द्यावी जेणेकरून स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी मागणी पातुर तालुका विकास मंचचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी तहसील कार्यालय मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी नायब तहसीलदार अतुल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी युवा सेना शहर अध्यक्ष पातुर योगेश फुलारी , डॉ विलास हिरळकार,ईश्वरसिंह ठाकुर,महाविरसिंह ठाकुर, भगतसिंह ठाकुर आदी मान्यवर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: