ताज्या घडामोडी

नया अंदूरा येथील शाळेतील शिक्षकाला आढळले कोरोनाची लक्षणे

अंकित क-हे

ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा

बाळापूर तालूक्यातील ग्राम नया अंदूरा गावातील शाळेतील शिक्षक लोकांची दिनांक १९/११/२०२० पासून बाळापूर येथे कोरोनाची टेस्ट सुरू करण्यात आली होती त्यामध्ये नया अंदूरा गावातील जिजामाता विद्यालयातील शिक्षक लोकांची टेस्ट करण्यात आली होती टेस्ट केल्यानंतर दिनांक २०/११/२०२० रोजी दुपारी जवळपास १२ वाजता अकोला जिल्हा कोरोना अव्हाल आल्यानंतर नया अंदूरा गावातील जिजामाता विद्यालयात कार्यरत असलेल्या एका शिक्षकाला कोरोनाची लागवण झाल्याचे समोर आली आहे अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शाळा दिनांक २३/११/२०२० रोजी उघडणार आल्यानंतर अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावातील महाविद्यालयातील शिक्षक लोकांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे त्यामध्ये काही शिक्षक कोरोना बाधित आढळून येते आल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण होत आहे शिक्षण मंत्री यांनी घोषित केलेले नियम असे ते पुढील प्रमाणे प्रकाशित करण्यात आले आहे.
( १) शाळेतील वर्ग ९ते १२ सुरू करण्यात येणार आहे (२) शाळेमध्ये एका ठिकाणी एक विध्यार्थी (३) शाळेमध्ये विध्यार्थ्यांनी किंवा शिक्षक लोकांनी एकत्र येऊ नये (४) शाळेमध्ये विध्यार्थ्यांनी व शिक्षक लोकांना तोंडाला रुमाल किंवा मास्क वापरने बंधनकारक आहे (५) वेळोवेळी सेनीटाइजर वापरने (६) शाळेमध्ये सॅनिटाइजर फवारणी करणे आवश्यक आहे.उर्वरित वर्ग म्हणजे वर्ग १ ली ते ८ परंतु विध्यार्थ्यांना शाळेत न बोलावता आॅनलाईन क्लासेस घ्यावे पुढील सुचना येईपर्यंत वर्ग १ली ते ८ वर्ग चालू करू नये असे आव्हान सुध्दा करण्यात आले आहे .अकोला जिल्ह्यातील वर्ग ९ वी ते १२ वर्गातील विध्यार्थ्यांना एका दिवसी न बोलावतात वेगवेगळ्या गटाने त्यांना शिक्षण द्यावे आणि शिक्षक लोकांनी ज्या गावात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांनी त्याच गावात स्थाईक राहावे जेने करून कोरोनाचा प्रसार वाढणार नाही सर्व विध्यार्थ्यांना कमीत कमी दोन दोन तासाच्या अंतराने शिक्षणा द्यावे एकत्र बसून शिक्षण देऊ नये एकत्र शिक्षण देल्यास धोकादायक ठरू शकते काल नया अंदूरा गावातील शाळेतील एक शिक्षक कोरोना बाधित असल्याची माहिती पसरताच संपूर्ण बाळापूर तालूक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले होते याची भिती बाळगत नया अंदूरा गावातील जिजामाता विद्यालयातील मुख्याध्यापक यांनी शाळेतील शिक्षक व विध्यार्थ्यांना नियमांचे कळेकोळ नियमाचे पालन करण्यासाठी सुचना द्याव्यात अशी मागणी बाळापूर तालूक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: