ताज्या घडामोडी

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उन्हाळी 2020 च्या ऑनलाईन परीक्षेत भोंगळ कारभार

सम्यक विद्यार्थी आंदोलनाने लावला कुलगुरूंना चुना

उन्हाळी 2020 च्या परीक्षांच्या वेळापत्रकात 3 वेळा बदल


तीव्र आंदोलन षेडण्याचा सम्यक विद्यार्थीच्या वतीने इशारा

अविनाश एस. पोहरे – संपादक

अकोला एक्सप्रेस न्यूज

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ठरवून दिलेल्या उन्हाळी 2020 च्या परीक्षांच्या वेळापत्रकात 3 वेळा बदल करून sgbau pariaksha अँप डेव्हलप  करण्यात आले होते. परंतू दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी दहा वाजता असणारा पेपर आतापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांचा लॉग इन झाला नाही.

परीक्षेसंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी दिलेले सगळे मोबाईल नंबर नेमके एकाचं वेळीनॉट रिचेबल दाखवत होते हे नेमकं कोडं समजण्या पलीकडे होते. अशा परिस्थती मध्ये मध्ये सर्व विद्यार्थी हे गोंधळात पडले असून त्यांना ना विद्यापीठा कडुन ना त्यांच्या महाविद्यालयाकडुन समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. हि वास्तविकता होती. विद्यार्थ्यांना नैराश्याच्या खाईत ढकलण्याचे काम विद्यापीठ करत आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली याला जबाबदार कोन?नियोजनाअभावी घेतलेले हे निर्णय असून यामध्ये विद्यापीठातील काही जबाबदार प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यांचे वैयक्तीक हितसंबंध गुंतलेले असल्याचा सूर सर्वदूर उमटत आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास आणि आर्थिक पिळवणूक याचा अंदाज कदाचित विद्यापीठाला नसून त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून चुना लावला आहे. त्यांच्या भावनेशी खेळले आहेत. म्हणून वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अकोला एक दिवसीय चुना लगावो आंदोलन करीत आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल व विद्यापीठाने केलेल्या फसवणूकीसाठी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, परीक्षा नियंत्रक डॉ. हेमंत देशमुख व ऑनलाईन अँप बनविणारे Promarc Software Pvt. Ltd. या कंपनीच्या मालकांवर विद्यार्थ्यांची फसवणूक केल्यामुळे कलम 420 , कलम 120 ब फोजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक झाली त्यांना त्यांचे पैसे विद्यापीठाने परत द्यावे , विद्यार्थ्यांची परीक्षा परीक्षेचे पूर्ण नियोजन झाल्यावरच घ्यावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. याची योग्य दखल न घेतल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने देण्यात येत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: