आलेगाव येथील आठवडी बाजारावर अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य

कृष्णा मोहाडे
आलेगाव प्रतीनिधी
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील आठवडी बाजारामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमण व घाणीचे प्रमाण खूप वाढले आहे. आठवडी बाजार करणाऱ्या लोकांबरोबर व्यापाऱ्यांना सुद्धा साथीचे रोग होण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या माहिन्यांपासून कोरोना लोकडाऊन मुळे आठवडी बाजार बंद आहे. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन गावातील काही लोकांनी आठवडी बाजारामधील ओट्यावर गुरांचे गोठे तयार केले व बाजूलाच शेणाचे ढिगारे बनविले आहे.या शेणाच्या ढिगाऱ्यातून निघणारा वायू हा आरोग्यास हानिकारक असतो यामुळे विविध साथीचे रोग होण्याची दाट शक्यता आहे. याकडे ग्राम पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे त्यामुळे हा प्रकार घडत आहे. याच ठिकाणी जि.प. मराठी कन्या शाळा , उर्दू शाळा ,गुरांचा दवाखाना ,पोलीस चौकी आहे.तसेच आठवडी बाजारात तब्बल ३७ ते३८गावचे लोक बाजार करण्याकरिता येतात पातूर पंचायत समिती अंतर्गत असलेली आलेगाव ग्राम पंचायत हि पातूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रा.पं.समजली जाते काही वर्षांपूर्वी माजी सरपंच अर्चनाताई राऊत यांनी बाजारामध्ये ओटे बांधून दिले होते या ओट्यांवर काही लोकांनी आपली पाळीव जनावरे बांधण्याकरिता गोठे बांधले व त्या ठिकाणी आपली जनावरे बांधत आहेत. जनतेचे आरोग्य लक्षात घेता ग्रा.पं. प्रशासनाने या बाबींची दखल घेऊन अतिक्रमण व घाण त्वरित हटवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.