ताज्या घडामोडी

जिल्हयात 36 कलम लागू ; जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे आदेश


राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला. जिल्ह्यात १७ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर पर्यंत “नवदुर्गा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच २५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव व बौध्द धर्मियांचे वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमीत्त अकोला शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्सव काळात अकोला जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्राप्त असलेल्या कलम ३६ अन्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यांचेपेक्षा वरील दर्जाचे अधिकाऱ्यांना १७ ऑक्टोंबर ते ३१ ऑक्टोंबर पर्यंत पर्यन्त जादा अधिकार प्रदान केले आहे.
मुर्ती स्थापना व विसर्जन संबंधाने रस्त्यावरुन जाणाऱ्या किंवा इतर उत्सव अथवा जमावातील लोक अशा
रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी ? या विषयी निर्देश देणे, मुर्ती स्थापना / विसर्जन व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकाच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे. मु्ती स्थापना व विसर्जनाचे अनुषंगाने ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नदयांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किंवा ढोल ताशे, शिट्ट्या व इतर कर्कश वाद्य वाजविर्ण वर्गरे बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमाचे कलम 33,36,37 ते 40, 42, 43, व 45 अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पृष्टी देणारे आदिचा समावेश आहे.या आदेशाची कोणत्याही इसमाने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येवून तो शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: