शेतकरी बांधवाच्या डोळ्यात परतीच्या पावसाने आणले पाणी!
अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ नया अंदूरा
सध्या शेतकऱ्यांचा खरिप हंगाम सुरू आहे यावर्षी सुरूवातीला झालेल्या पावसाने शेतातील पिकाची परिस्थिती उत्तम असल्याचे कोरोनाच्या काळातसुद्धा शेतकरी हिरवे स्वप्न रंगवत असतांना पीक हातात येण्याची वेळ आली असतांना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनचा घात केला असून, एेन सोयाबीन काढणीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी गेल्या आठ महिन्यापासून कोरोनाच्या सावटाखाली सर्व जण होते कोरोनासारख्या मारामारीपासून स्वत:चे रक्षण करण्याकरीता शासन स्वयंमपुर्तीने सर्वांनी शोशल डिस्टन्सिंगचे नियममाचे पालन केले अशा परिस्थितीत सुध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करीत शेतातील कामे पूर्ण केले खरीप हंगामाचे मुख्य पीक असलेले सोयाबीन, कपाशी, तुरीचा, पेरा केला कोरोनाचे संकट असतांना निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली पेरणीनंतरच्या दिवसात ज्या वेळेस पिकांना पाण्याची आवश्यक होती त्यावेळी निसर्गराजा बसला शेतातील पीके उत्तम दिसू लागली नदी- नाले दुधडी भरून वाहू लागले बाळापूर तालूक्यातील नदी- नाले मोर्णा, पूर्णा मन, पानखास, नद्या शंभर टक्के भरल्याने अोव्होरफ्लो झाल्या व शेतातील विहीर तुडूंब भरल्या यामुळे खरिप सोबत रब्बी पिकांचा हंगाम चांगला होणार या आशेचा किरण शेतकऱ्यांनचा मनात जागा झाला आहे परंतु एेन सोयाबीन पिकाचे काढणिचा हंगाम आला व निसर्गाने आपली किमया दाखविण्यास सुरूवात केली परतीच्या पावसाने बाळापूर तालुक्यात हजेरी लावली शेतात पाणी साचलेले सोयाबीन, कपाशी, पिके पिवळी पडू लागली कापणी करणे कठीण झाले जे सोयाबीनचे पिक हाती आले की
त्याला पाहिजे त्या प्रमाणात उतारा येत नसल्याने खर्च उतपन्नाचे गणित बिघडले आहे यानंतर गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने मुक्काम ठोकल्याने सोंगूंन ठेवलेल्या सोयाबीन गंजीला जागेवर कोंब फुटत आहेत शेतात कापणी करणे मशीनच्या साह्याने काढणे कठीण झाले आहे.शेतात जाणाऱ्या रस्त्यावर चिखल साचल्याने शेतकऱ्यांना शेतात जाता सुध्दा येत नाही दोन दिवसा आगोदर अंदूरा ते बाळापूर शेत रस्त्यावर शेतकऱ्यांनचे वाहने भर रस्त्यावर फसलेले होते एकंदरीत पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक हातातून गेले यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना शेतात उभ्या असलेल्या तूर व रब्बी हंगामाकूडून शेतकऱ्यांना मोठी आशा दिसत आहे तरी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानिबाबत शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांनच्या पाठीशी उभे राहावे अशी मागणी बाळापूर तालूक्यातील शेतकरी करीत आहेत











