नया अंदूरा परिसरात अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत

अंकित क-हे
ग्रामीण प्रतिनिधी/ कवठा
बाळापूर तालूक्यातील येत असलेल्या ग्राम नया अंदूरा, कारंजा(रम), हाता, अंदूरा, हातरूण, शिंगोली, खंडाळा, मांजरी, बोरगाव वैराळे, निमकर्दा, मोरगाव सादीजन, उरळ,मोरझाळी, टाकळी खोजबळ, पारस, अंत्री मलकापूर, कवठा, बहादुर,लोहारा, कळंबा, कुसुरा,कोळासा,निंबा वझेगाव, नागद, सागद,दगळखेळ, मोखा,काझिखेड, या गावात अवकाळी पावसाने जबरदस्त हजेरी लावल्याने कपाशी, ज्यारी, सोयाबीन, तुर, पीकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेचा कोरोनाच्या मारामारीत शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने शेतकर्यांना एका पाठोपाठ अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस हिसकावून घेत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामध्ये सुरूवातीला अवकाळी पावसाने बाळापूर तालुक्यात एकसारखी हजेरी लावली होती त्यावेळी बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांचे तिळ पीकाचे अतोनात नुकसान झाले होते परंतु बाळापूर तालूक्यात दिनांक ११/१०/२०२० पासून जबरदस्त हजेरी लावणे सुरू केली त्यामुळे शेतकर्यांचे कपाशी, ज्यारी, सोयाबीन, तुर,पीकाचे नुकसान बाळापूर तालूक्यात पाहायला मिळत आहे बाळापूर तालूक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षापासून अनेक योजनांचा लाभ सुध्दा नाही तत्यामधील(१) पिएम किसान योजना (२) एक वर्षापासून दुष्काळ मदतीची अपेक्षा (३) बोंडअळी मदत नाही (४) मागील वर्षाचा पीक विमा नाही बाळापूर तालूक्यातील प्रत्येक गावातील ठराविक लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता शेतकरी गटात सामील करून घेतल्याने त्यांना एकदाही फ्री राशन उपलब्ध झाले नाही अशा अडचणी बाळापूर तालूक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना आहेत त्यांच्या अडचणी कोण दूर करणार असा प्रश्न बाळापूर तालूक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना पडला आहे बाळापूर तालूक्यात अशा प्रकारे अवकाळी पाऊस आपली हजेरी लावणार तर बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनी काय करावे कारण बाळापूर तालूक्यातील काही गावात कापशी वेचणीला सुरूवात झाली आहे व सोयाबीन सोंगणीला आलेले आहेत काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी करून शेतात ठेवलेले असतांना त्या सोयाबीन पीकाला को़ंंब आले आहे ज्यारी सोंगणी सुरू होताच बाळापूर तालूक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ज्यारी पीके काळीशार झाल्याने काही भागात ज्यारी पीक मातीमोल झाले आहे तसेच तुर पीकावरील फुलोर सर्व अवकाळी पावसाने काढून घेतल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटात सापडला आहे यंदा सर्व पीकाचे नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आपल्या शेताला लावलेला खर्च निघेल की नाही याची वाट पाहत आहे अकोला जिल्ह्यातील पालकमंत्री साहेब तथा बाळापूर तहसीलदार साहेब बाळापूर कृषी अधिकारी साहेब यांनी प्रत्यक्ष बाळापूर तालूक्यात सर्वे करून संबंधित कृषी साह्यक साहेब तहसीलदार साहेब पटवारी साहेब कोतवाल यांना तातडीने आदेश जारी करून बाळापूर तालूक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागात पाहणी करून बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करून तातडीने बॅंक खात्यात जमा करावी अशी मागणी बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कोरोनाच्या महामारीत कोरोणाने लोकांच्या जिवावर जशी मात केली तशी यावर्षी सुरवातीपासून शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे नगदी असलेले पीक म्हणजे मुंग उळीद आहेत या पीकावर अदण्यात रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले मुंग उळीद पीक मातीमोल झाले होते जागतिक महामारीत शासनाने जनतेच्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित केले अशाच नैसर्गिक दुष्टचक्रात पावसाच्या सतत्याने उभे पिक निस्तानाभूत झाली सुरवातीला डैलदार दिसणार्या पिकामध्ये उळीद व मुंग पिकाने शेतकऱ्याच्या पदरात येणाऱ्या नगदी पिकाला नख लागल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे अश्यातही संकट कधीतरी सकते हिम्मत पुरून उरते या म्हणीला अनुसरून शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पुरेपुर मेहनत घेतली पैसा अडका नसतांना शेतकऱ्यांनी खरीप हंगाम उभा केला मुंग उळीदानंतर रब्बी हंगामातील सुरवातीला सुध्दा तयारी केली असता रविवार बाळापूर तालूक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केलेल्या पीकाचे मुसळधार पावसाने होत्याचे नव्हते केले आहे काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन सोंगणी करून ठेवली होती परंतु अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पीकाला शेतातच कोंब फुटले व कपाशी पीकाचे नुकसान ज्यारी पीक मातीमोल झाले तुर पीकावरील फुलोरा नासधूस झाला आहे बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आर्थिक संकट सापडले आहे तरी शासनाने तातडीने बाळापूर तालूक्यातील प्रत्यक्ष शेतात जाऊन कोणत्याही पटवारी यांच्या वर विश्वास न ठेवता कारण काही पटवारी कार्यालयातून शेतातील पंचनामे करतात म्हणून कोणत्याही अधिकार्यांनंवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसान झालेल्या पीकाचे पंचणामे करून बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी बाळापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे