ताज्या घडामोडी

दिव्यांगाच्या योग्य पुनर्वसनासाठी सर्वकष सर्वेक्षण करा __पालकमंत्री यांचे निर्देश

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला. जिल्ह्यातील दिव्यांगाचे सक्षम व योग्य पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे याकरिता दिव्यांगाची इतंभूत माहिती संकलन करण्यासाठी सर्वच सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व व लाभ क्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला व बाल विकास इतर मागास वर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले आहेत या माहितीचा वापर करून अद्यावत संगणक प्रणाली तयार करून सर्व शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देता येईल येईल असे नामदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केले यासंदर्भात पालकमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले असता यावेळी विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरिया विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर महानगरपालिकेचे आयुक्त संजय कापडणीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्याचा दिव्यांग कल्याण व पुनर्वसन आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे मत नामदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले दिव्यांगतवांचा प्रकाराचे निदान करणे व त्यावर योग्य वैद्यकीय उपचार करून दिव्यांगा त्व कमी व नाहीसे करून त्या व्यक्तीस सक्षम बनविणे तसेच त्यांचे कौशल्य ओळखल पाहून आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नामदार बच्चू कडू यांनी केले या पद्धतीचे काम करून दिव्यांगांच्या योग्य पुनर्वसनाचा आदर्श राज्यात निर्माण करावा असे त्यांनी त्या वेळेस सांगितले यावेळी उत्तम संगणक प्रणाली तयार करणे त्यासाठी दिव्यांगाची इतंभूत माहिती व सामाजिक आर्थिक इत्यादीचे संकलन असे निर्देश नामदार कडू यांनी त्या वेळी उपस्थितांना दिली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: