ताज्या घडामोडी

तेल्हारा तालुक्यातील निम्मा गावांमधील पोलिस पाटील पदे रिक्त!

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

तेल्हारा तालुक्यातील शासन व ग्रामस्थ यांच्यामधील ग्रामपातळीवर सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे पोलिस पाटील तेल्हारा तालुक्यातील पोलिस पाटीलांची निम्मे पदे रिक्त आहेत १००पैकी ४२पदे रिक्त आहेत त्यामुळे गावातील घटनांची माहिती वादविवाद यावर नियंत्रण नसल्याची परीस्थिती आहे त्यामुळे गावातील पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे पोलिस पाटीलांची पदे अघाप भरली गेली नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना दुसऱ्या गावात हेलपाटे घेऊन दाखले आणावे लागत आहेत काही गावातील पोलिस पाटलांकडे दुसऱ्या गावाचा प्रभार सुध्दा दिला नसल्याचे समजते गावातील सर्व शासकीय कामे पोलिस पाटलांच्या मदतीने केली जातात तेल्हारा तालुका अंतर्गत तेल्हारा व हिवरखेड हे दोन पोलिस स्टेशन अंतर्गत ५४तेल्हारा पैकी २५गावात पोलिस पाटील पद रिक्त आहे तर हिवरखेड पोलिस स्टेशन मधील ४६पैकी१७पदे रिक्त आहेत अशी १००पैकी ४२ पदे रिक्त आहेत काही गावातील रिक्त पदांचा प्रभार दुसऱ्या गावातील पाटलाला देण्याची प्रक्रिया सुध्दा झाली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे शासकीय कामात ओळख दाखला जात प्रमाणपत्र विविध पिकांचे नुकसान अहवाल इत्यादी करीता पोलिस पाटलांची स्वाक्षरी ओळख.हजेरी महत्त्वाची असते परंतु गावात पोलिस पाटील उपस्थित नसल्यास आल्या पावली परत यावे लागते त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: