ताज्या घडामोडी
सुनील वानखडे यांना महाराष्ट्र रत्न मानवसेवा पुरस्कार

भिमकिरण दामोदर हाता बाळापूर
- ११वे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन यांच्या मार्फत व मानवविकास फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा 2019-20 चा महाराष्ट्र रत्न मानवसेवा पुरस्कार..अनु.जाती मुलीची शासकीय निवासी शाळा,शेलद ता-बाळापूर जि -अकोला येथील उपक्रमशील सहाय्यक शिक्षक गुणवंत आंतरराष्ट्रीय खेळाडू , दिव्यांग रत्न सुनील भाऊराव वानखडे याना मिळाला आहे. शैक्षणिक गुणवत्ता,शैक्षणिक नवोपक्रम, विद्यार्थी यांच्या कडून हस्तलिखिते तयार करणे,शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग ,पर्यावरण, रक्तदान शिबिर,दिव्यांग क्रिडा ,सामाजिक कार्य,दिव्यांग मतदार जागृती हे सर्व कार्य केले आहे .या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल व शैक्षणिक कार्यास प्रेरणा मिळावी तसेच स्वतःच्या कार्याची ओळख समाजासमोर निर्माण केल्याबद्दल व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र रत्न मानवसेवा पुरस्कार २०२० चा पुरस्कार ऑनलाईन पद्धतींने देण्यात आला यामध्ये आकर्षक सन्मानचिन्ह, अभिलेख स्वरुप मानपत्र,महापुरूषांचे जिवनचरित्रावर पुस्तक, शाल , देण्यात येणार आहे..
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.