दहीगांव मध्ये गोमाता चे पुजन करुन लम्पी स्किन डिसीज आजाराचे लसीकरण करण्यात आले

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील दहिगांव येथे पशु वैद्यकीय दवाखाना पंचगव्हान श्रेणी-२ अंतर्गत दिनांक,०२/१०/२०२० रोजी गावामध्ये लम्पी स्किन या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या लम्पी स्किन विषाणूजन्य आजारामुळे पशुपालक घाबरलेले आहेत या संसर्गजन्य आजार असुन गावामध्ये जर एका पशुला आढळला तर शेतकरी तथा पशुपालक कमालीचे घाबरून जातील या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जवळ जवळ २२८ पशुधनांना लसीकरणाचा लाभ घेता आला या शिबिरा व्यतिरिक्त घरोघरी जाऊन सुद्धा लसीकरण करण्यात आले या शिबिरात प्रथम गोमातेचे पुजन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली गोमातेचे पुजन करतांना पोलीस पाटील अरविंद अवताडे,पंचायत समिती सदस्य पती अतुल घंगाळ,ग्रामविकास अधिकारी करवते मॅडम,आरोग्य अधिकारी डॉ भारत वानखडे,ढोले परिचर, त्यावेळी उपस्थित शेतकरी सुरेश लोनाग्रे, रामसिंग डाबेराव, सारंगधर वरखडे,विठ्ठल म्हसाळ , संतोष कोगदे, सागर खराटे, अण्णा इंगोले, राजेश झापडै,नितीन चिंचोलकार, प्रवीण सोळंके, राहुल महाले, यशवंत चंदन, रोशन भिवटे इत्यादी हजर होते