आरोग्य केंद्राचे रुग्णालयात रुपांतर करणे बाबतीत निवेदन

राजकुमार चिंचोळकर
जिल्हा प्रतिनिधी अकोला
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे बाबतीत निवेदन सादर करण्यात आले आहे वाडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुगत डोंगरे यांच्या सह नागरिकांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये वाडेगाव येथील अंदाजे ३५ ते ४० हजार लोकसंख्या असुन परीसरातील जवळपास २२ गावातील नागरिकांचा वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय उपचार संदर्भात संपर्क येतो तर परीसरातील ९ उपकेंद्र जोडले आहेत या बाबींचा विचार करता येथे विविध वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते तर विविध आजार संदर्भात नागरिकांना उपलब्ध सुविधा अभावी अकोला किंवा बाळापूर येथे जावे लागले परीनामी नागरिकांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागतो करीता वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यात यावे असे मुख्यकार्यकारी अधिकारी अध्यक्ष जिल्हा परिषद अकोला आयुक्त समाज कल्याण जिल्हा आरोग्य अधिकारी व सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद अकोला यांच्या कडे निवेदन सादर करण्यात आले आहे