ताज्या घडामोडी
पांढुर्ना ग्रा.पं.चा प्रताप एक काम दोन वेगवेळ्या निधीमधून दाखवून अपहार केल्याची तक्रार

कृष्णा मोहाडे
ग्रामीण प्रतिनिधी आलेगाव
जानेवारी – फेब्रुवारी महिन्यामध्ये पांढुर्ना ग्राम पंचायतने पांढुर्ना व सोनूना येथील अंगणवाडी
दुरुस्ती चे काम केले होते हे काम ग्राम पंचायतने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून केले यामध्ये अंगणवाडीच्या खिडक्या,रंगरंगोटी तसेच फरशीचे काम केले होते त्या नंतर तेच काम जिल्हा परिषेदेच्या विशेष सहाय्य अनुदान निधीमधून दाखवून अपहार केल्याप्रकरणी या प्रकाराची सविस्तर चौकशी व्हावी हा प्रकार ग्रा.पं.पांढुर्ना व शाखा अभियंता व्ही. आर. शिंदे यांनी केला असल्याची तक्रार ग्रा.पं.सदस्य निलेश संजय सोनोनो यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शासनाच्या निधीच्या या अपहरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी असे या निवेदनात म्हटले आहे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.