ताज्या घडामोडी

पारस येथे संघर्ष कंत्राटी कामगार समिती गठन

महेश उमाळे
पारस प्रतिनिधी

औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे दिनांक 27/09/2020कंत्राटी कामगार यांच्या मुलभूत अधिकार आणि विविध मागण्यांसाठी कुठल्याही बाहेरील युनियन ची साथ न घेता सर्व कंत्राटी कामगारांनी एकजूट होऊन पगार वाढीसाठी जो लढा ऊभा केला होता त्याच लढ्याच्या आधारे आवाज दो या जयघोषाने संघर्ष कंत्राटी कामगार समीती ची स्थापना करण्यात आली यामध्ये समीती अध्यक्षपदी मा.सतिश अशोक तायडे यांची निवड करण्यात आली व तसेच उपाध्यक्ष पदी नितेश तायडे,कोषाध्यक्ष पदी तेजराव वानखडे, सहकोषाअध्यक्ष पदी राहुल भड,सचिव पदी मनोहर अवचार, सहसचिव पदी अजय राजनकर,सल्लागार पदी पवन खत्री, रामेश्वर खंडारे, जानराव खंडारे, मिडिया प्रमुख पदी मुरसलीन खान,नियोजक पदी नितिन ठाकरे,सहनियोजक पदी नितीन मनसुटे,सोशल मिडिया प्रमुख पदी नितेश तायडे,नितिन ठाकरे यांना पदे देण्यात आली सदर समीती गठनाचा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयावर साजरा करण्यात आला कार्यक्रमाला सर्व कंत्राटी कामगार उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: