ताज्या घडामोडी

सततच्या पावसाने सोयाबीन कपाशी पिके धोक्यात ;कपाशी बोंडे पडली काळी ;सोयाबीनच्या शेंगा ना कोंब तालुक्यात हंगाम धोक्यात;शेतकऱ्याची भरपाईची मागणी.

नासिर शहा
प्रतिनिधी पिंपळ खुटा

सततच्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे उमरा,राहेर,(अडगाव)पिपंळखुटा, या गावामध्ये कपाशीचे बोंडे काळी पडली असून पीक हातून जाण्याची भिंती शेतकऱ्यांना सतावत आहेत.
उळीद-मुगाचे पिक बहारावर असताना पावसाने पिकांना तडाखा दिला.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पिकाचा दाणाही लागला नाही. ज्वारी,व सोयाबीन, तूर,तिळ,केळी,या सुद्धा पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा कपाशी कडून होती.इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरवला.तर गेल्या आठवड्यात भराच्या सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ व दमट वातावरणामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधून झाली कपाशीची बोंडे फुटण्यायांच्या बेतात असताना पावसाच्या कहराने कपाशीची फुलपाती,बोंडे,सडून काळी पडली फुटलेली कपाशी सुद्धा खराब होवून गळती लागली आहे तर पराटी लाल पडत आहेत.पावसाने यापूर्वी उळीद,मुग पिकांचे नुकसान झाले आहे. या संकटामूळे शेतावर लावलेला खर्च सुद्धा निषणे कठीण ठरत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाववले आहे.तसेच वार्षिक खर्चाने गणित जुळविणे सुद्धा शेतकऱ्यांना कठीण ठरणार आहेत. त्यामुळे शेतकरीपुन्हा आथिर्क कोडींत सापडून कर्जात डोंगर वाढण्याची शक्यता नकारता येत नाही.हतबल शेतकऱ्यांना शासन स्तरावरुन मदतीचा हात देणे गरजेचे आहे.
तालुक्यात ओला दुष्काळ घोषीत करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
लोकप्रतिनींधी पाठपुरावा करावा
मा.नितिन देशमुख यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी
शिवसेना शाखा अध्यक्ष नाशिर शाँहा शेतकरी पिपंळखुटा यांनी केली आहे.
सोयाबिन कपाशी चे पिके सतत च्या पावसाने धोक्यात आले आहेत.शेंगा मधील दाने खराबहोत आहेत.तर कपाशीचे बोंड काळे पडत आहेत.सोयाबीनला कोंब फुटले आहेत.त्यामुळे सोयाबीन,कपाशी, उत्पादन शेतकरी यांना नुकसान भरपाई देण्यात येऊन ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी महादेव जयराम कोळशे शेतकरी राहेर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: