ताज्या घडामोडी

जय भगवान महासंघाच्या सिंदखेडराजा तालुका कार्यध्यक्ष पदी सोनू घुगे यांची नियुक्ती.

केशव सातपुते
लोणार प्रतिनिधी.

आज जय भगवान महासंघाच्या विविध नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये सोनू घुगे रा. खैरव यांच्या खांद्यावर सिंदखेडराजा तालुका कार्यध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली खर तर सोनू घुगे म्हणजे सळसळते चैतन्य, अतिशय उत्साही माणूस आपल्या गावामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांचे मंदिर झाले पाहिजे, त्यांच्या पुण्यतिथी ला सप्ताह संपन्न झाला पाहिजे यासाठी पुढाकार घेणारा धडपड्या तरुण. त्यांच्याच प्रयत्नातून भगवान बाबांचे भव्य दिव्य मंदिर उभे राहिले.त्यांच्या सर्व सहकारी यांच्या मदतीने दरवर्षी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करतात.संत भगवान बाबांचे व लोकनेते गोपीनाथ राव मुंडे साहेबांचे विचार समाजात पेरण्याचे काम आजपर्यंत सोनू घुगे यांनी केले आहे त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांची जय भगवान महासंघाच्या सिंदखेडराजा तालुका कार्यध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली जय भगवान महासंघाचे विदर्भ अध्यक्ष शंकर उगलमुगले जिल्हा अध्यक्ष सिद्धेश्वर आंधळे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली.त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन त्यांच्या हातून समाजाची सेवा घडावी या अपेक्षा सह त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
यावेळी दीपक कायंदे पोलीस पाटील, नागेश मुंडे उपाध्यक्ष जय भगवान महासंघ , गणेश पालवे जिल्हा सचिव जय भगवान महासंघ,उमेश हुसे यासह जय भगवान महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: