वान धरणात आता ९३.२८टक्के जलसाठा

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
अकोला बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधण्याऱ्या तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणात आज दिनांक २४ सप्टेंबर २०२० रोजी ९३.२८टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती वान धरण अधिकारी यांनी दिली या धरणात दर दिड तासांनी १ सेमी ने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात झालेले कमी पजन्यमान पाहता धरणात याधरणात सुरुवातीपासूनच कमी कमी जलसाठा येत आहे तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणात सध्या ९३.२८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असुन धरण ९५ टक्के भरल्यानंतर दरवाजे उघडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वान धरण अधिकारी यांनी दिली आहे वारी परिसरात व पहाडपटी भागात पावसाचे वातावरण व धरणात पाणी येण्याची गती लक्षात घेऊन ९५ टक्के पेक्षा जास्त वाढ झाल्यास कुठल्याही क्षणी धरणाचे पाणी वान नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याने वान नदी पात्राशेजारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वान धरण धरण हे धरण १०० टक्के भरणार हे नक्की की नाही याबाबतही प्रश्न चिन्ह उभे राहिले होते या धरणावर अनेक गावांचा पाणी प्रश्र्न अवलंबून आहे शिवाय शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे हे नक्की आहे पण हे येणारा काळच ठरवेल