ताज्या घडामोडी
बिल्डिंग पेंटर बांधकाम व संघटित मजुर संघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

नितीन हुसे
शहर प्रतिनिधी
बाळापुर शहरात बांधकामाच्या विविध प्रलंबित मागण्या बिल्डिंग पेंटर बांधकाम, व इतर असंघटित मजुर संघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री साहेब, यांना उपविभागीय अधिकारी बाळापुर,यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. त्यामधील प्रमुख मागण्यांपैकी कोव्हिडं-१९ रिलीफ फंड पाच हजार रुपये, व विवाह पूर्तीचा लाभ तात्काळ देण्यात यावा. व इतर मागण्या करीता निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी अफरोज खान,शेख आसिफ, अमजद खान, मोहम्मद सलीम, शेख अहमद, कमर शाह,मो निसार, मो खालील, मसूद अहमद, शेख नियाज, व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.