प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक ज्वलंत विषयावर आधारित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन
द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांचा स्तुत्यप्रिय उपक्रम
अविनाश पोहरे / अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
पातूर शहरातील एकमेव सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, व कला क्षेत्रात अग्रेसर असलेली द प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे संस्थाध्यक्ष पंकज पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक ज्वलंत विषयावर आधारित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
द प्रोफेशनल करिअर अकॅडमी हे नेहमीच विविध क्षेत्रात पुढे असतांना गेल्या तीन वर्षांपासून दिसते.
यावर्षी सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तसेच कोरोना जनजागृती व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
ही चित्रकला स्पर्धा स्पर्धकाने स्वतः च्या घरून बारा बाय आठ एवढ्या आकाराच्या कागदावर पुढील विषयावर आधारित चित्र काढुन द प्रोफेशनल करिअर अकॅडमी बहूउद्देशीय संस्था टी. के. व्ही. चौक तिसरा मजला पातूर या कार्यालयात 31 जानेवारी पर्यंत जमा करावीत.
या स्पर्धेचे विषय ‘बेटी बचाव -बेटी पढाव, ‘स्त्री भ्रूण हत्या’, ‘2020 मधील कोरोना’, ‘वृक्षतोड एक समस्या’, ‘प्रदूषण एक समस्या’, ‘मोबाईल चे वाढते दुष्परिणाम’
‘पाणी अडवा -पाणी जिरवा’ ‘कोरोना जनजागृती ‘ या विविध विषयावर आधारित चित्र असावीत. तर या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयाची अट नसून कोणत्याही शालेय विध्यार्थी सहभागी होऊ शकतो. उत्कृष्ट तीन चित्रास योग्य बक्षीस व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येइल. तसेच सहभागी सर्व विध्यार्थ्यांना एका महिन्याचे मोफत चित्रकला प्रशिक्षण देण्यात येईल. याची नोंद घ्यावी.