शेतीच्या मोजणीची तारीख देऊन मोजणी साठी शासकीय कर्मचारी न पोहोचल्याने भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले कुलूप.

अविनाश पोहरे – संपादक
पातूर दि. १८ – भंडारज बु येथील शेती मोजणीचे अतितातडीने मोजणीचे पैसे भरून दिलेल्या तारखेला आज कुणीही अधिकारी कर्मचारी न आल्याने संतप्त शेतकरी राजेंद्र पातोडे ह्यांनी भूमी अभिलेख पातूर कार्यालयास कुलूप ठोकले.
राजेंद्र पातोडे ह्यांचे भंडारज बु येथे शेत आहे.सर्व्हे क्र १२६/१ च्या शेतीची मोजणीचा अर्ज सादर केला असता सदर शेतशिवारातील शेतीचे क्षेत्रफळ आणि सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ह्यांचे क्षेत्रफळा मध्ये तफावत असल्याने मोजणी करता येत नाही, असे बेजबाबदार उत्तर भूमी अभिलेख च्या वतीने देण्यात आले होते.त्यावर कार्यालयाचे रेकोर्ड तपासले असता नमूद क्षेत्रफळ आणि सातबारा वरिल क्षेत्रफळ ह्यात कुठलीही तफावत नसल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर अतितातडीने मोजणी करण्यासाठी दि १ डिसेंबर २०२० रोजी १२००० रुपये चालान भरून घेतले.सदर पैसे भरल्यानंतर १२/१२/२०२० रोजी मोजणी नोटीस काढण्यात आली.त्यानुसार घोडके नावाचे भूमापक ह्यांचे कडे मोजणी जबाबदारी दिली असून दि.१८/१/२०२१ रोजी मोजणी ठेवण्यात आल्याची नोटीस देण्यात आली.सदर नोटीस प्रमाणे सर्व आजूबाजूला असलेले शेतकरी आणि मोजणी करीता माणसे व्यवस्था करीत शेतकरी वाट पाहत होते.दुपारी ३ वाजे पर्यंत कुणीही फिरकले नाही.त्यामुळे पातूर भूमिअभिलेख कार्यालय गाठले असता ड्रोन मोजणी करीता कर्मचारी पाठविले असल्याचे सांगण्यात आले.मात्र मोजणी पुढे ढकलली ह्या बाबत कुठलीही सूचना राजेंद्र पातोडे ह्यांना देण्यात आले नाही.सोबतच उपअधीक्षक हे कार्यालयात हजर नव्हते, कुणाचाही फोन घेत नव्हते.म्हणून संतापलेल्या पातोडे ह्यांनी क्लसुंगे ह्यांचे कार्यालयास कुलूप ठोकले.शेवटी कार्यालय प्रमुख आल्यानंतर त्यांनी १ फेब्रुवारी ही मोजणी तारीख दिली त्यामुळे कार्यालयाचे कुलूप खोलून दिले.तफावत असल्याचे पत्र देणारे आणि मोजणी कमी गैरहजर राहणारे व सूचना न देणारे ह्यांचे विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.