ताज्या घडामोडी

अमरावती येथील राज्यस्तरीय धनगर समाज उपवधू-वर परिचय मेळावा ऑनलाइन संपन्न

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी

अमरावती येथील दहावा राज्यस्तरीय धनगर समाज उपवधु-वर परिचय मेळावा covid-19 च्या गंभीर परिस्थितीमुळे सामाजिक व कोरोनाचा परिस्थितीचे भान ठेवून,समाजबांधवांच्या सेवा,सुविधे करिता ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला.याप्रसंगी आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी प्रत्यक्ष अहिल्या स्मृती भवन येथे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे प्रतिमापूजन व सर्वांचे नेत्रदीपक असा दीप प्रज्वलित करून या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी मंचावर आयोजन समितीचे पदाधिकारी सर्वश्री ज्ञानेश्वरजी ढोमणे,काशिनाथराव फुटाणे,अरुणभाऊ बांबल,राजूभाऊ डांगे,अशोकराव इसळ,राजेंद्रजी मस्के,छबुताई मातकर, शारदाताई ढोमणे उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागतानंतर बायोडाटा संकलन करणारे श्रीमान जनार्दनजी घुरडे,तसेच मनोहरराव पुनसे,श्रीकृष्णराव ढोमणे,संजयजी ढाले व धनगर वधु-वर परिचय मेळाव्याची वेबसाईट निशुल्क तयार करून देणारे चि.मंदार राजू डांगे यांचा याप्रसंगी आयोजन समितीतर्फे सत्कार करण्यात आला.यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक व विविध संघटनांचे पदाधिकारी आयोजन समितीचे खंदे कार्यकर्ते श्रीमान काशिनाथराव फुटाणे यांनी मेळाव्याचे आयोजनात येत असलेले अनुभव तसेच समाज हीताच्या काही विशेष बाबी सांगून ह्या मेळाव्याचे स्वरूप दिवसेंदिवस वाढत असून या गंभीर परिस्थितीतही खंड न पडता आयोजन समिती आपली सेवा देत आहे असे मत प्रास्ताविकातून व्यक्त केले तसेच मंचावर उपस्थित श्री अरुणभाऊ बांबल,राजेंद्रजी मस्के,छबुताई मातकर,शारदाताई ढोमणे,राजू डांगे यांनी आपले विचार व्यक्त केले,तसेच परीचय मेळाव्याचे आयोजना करीता अथक परिश्रम घेनारे व विविध सामाजिक संघटनेशी जे सातत्याने संपर्क ठेवतात तसेच आयोजनाकरिता महत्त्वाची भूमिका पार पाडतात असे आयोजन समितीचे सक्रिय पदाधिकारी श्री ज्ञानेश्वरजी ढोमणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व या मेळाव्या करीता समाजाचा भरभरून प्रतिसाद नेहमीच असतो,परंतु या Covid-19 च्या कठीण, गंभीर परिस्थितीमुळे सामाजिक भान ठेवून हा मेळावा अत्यंत साध्या,सोप्या व सरळ पद्धतीने मोजक्या पदाधिका-यांचे उपस्थितीत घेण्यात येत असल्याचे विचार त्यानी व्यक्त केले तसेच रमेशराव मातकर,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करताना पुढील वर्षीच्या प्रत्यक्ष मेळाव्यात परदेशात असलेल्या समाजाच्या उपवधू-वरांना सुद्धा ऑनलाईन परिचय देण्याची संधी,सुविधा उपलब्ध करून देऊ असे मत व्यक्त केले.यानंतर या मेळाव्याच्या”जय मल्हार मंगल योग 2021″या पीडीएफ पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले,ज्यामध्ये जवळपास सहाशे उपवधू-वर यांचे परिचय पत्र असून अत्यंत सुंदर,संपूर्णता कलर असलेली,अशा पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,ही पुस्तिका सर्व व्हाट्सअप ग्रुप वर तसेच धनगर वधु वर मेळावा डॉट कॉम या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच मेळाव्याचे उद्घाटनाचे क्षणचित्रे, व्हिडिओज संवाद कम्युनिकेशन राजू डांगे या यूट्यूब चैनल वर उपलब्ध राहील.त्याचप्रमाणे या मेळाव्याची विशेषता म्हणजे सातासमुद्रापलीकडे म्हणजे विदेशात सिंगापूर येथे वास्तव्यास असणारे,तसेच महाराष्ट्रातील तथा महाराष्ट्रा बाहेरील उपवधू-वर व त्यांच्या पाल्यांनी ऑनलाइन पद्धतीने परीचय करून दिला. खऱ्या अर्थाने हा मेळावा राज्यस्तर याच्याही पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला आहे ही खऱ्या अर्थाने अमरावतीच्या मेळाव्याची विशेषता दिसुन आली.कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही समाज बांधवांचा भरगच्च प्रतिसाद हा नक्कीच आयोजन समितीचे उत्साह वाढवेल यात शंका नाही.आयोजन समितीचे सक्रीय पदाधिकारी,अशोकराव इसळ यांनी उपस्थित पदाधिकारी तसेच सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.शेवटी आयोजन समितीचे सक्रिय पदाधिकारी स्वर्गीय प्रभाकररावजी साव यांना सामुहिक भावपूर्ण श्रद्धांजली देऊन कार्यक्रम संपन्न झाला.येळकोट येळकोट जय मल्हार ही गर्जना करून कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे संचलन आयोजन समितीचे पदाधिकारी श्री राजू डांगे यांनी केले.
या मेळाव्या करीता ज्ञानेश्वरजी ढोमणे,काशिनाथराव फुटाणे,अरुण भाऊ बांबल,राजू डांगे,अशोकराव इसळ,राजेंद्रजी मस्के,शारदाताई ढोमणे,छबुताई मातकर,वर्षाताई मोहोळ,काजळे ताई,नामदेवराव खैरकर,रमेशरावजी मातकर,जनार्धन घुरडे,मनोहर पुनसे,श्रीकृष्णराव ढोमणे,सचिनभाऊ शहाकार,प्रमोदराव तालन,महादेव रोकडे,मोहनराव बोबडे,विष्णुपंत चुडे,रामदासजी मुंदाने,सुभाषराव धवणे,मंगेश महात्मे ह.भ.प.घोडस्कर महाराज,मंदार डांगे,डॉ.अविनाश मोहोड,सतिषराव तिडके,अरुणभाऊ अवघड,गोवर्धनजी गोटे,रामेश्वर निघोट,रामहरी घुरडे,हर्षल सावळे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: