अडुळा बाजार येथे जनविकास परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय ग्राम विकास आघाडीचा उडविला धुव्वा..

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
दर्यापूर: तालुक्यातील 15 जानेवारी 2019 ला झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत अडुळा बाजार येथील विकास परिवर्तन पॅनलचे ९ पैकी ७ उमेदवार निवडून आले.यात वार्ड क्रमांक 1 मधून अंकुश सुरेशराव खंडारे,हर्षणा सुनील बोंडे,वार्ड क्रमांक 2 मधून रिमानाबी रिजवान बेग,राजकन्या पुरुषोत्तम नाथे वार्ड क्रमांक 3 मधून शिवसेनेचा बालेकिल्ला भुईसपाट केला यामधून प्रचंड बहुमताने सौ.तनुजा नरेंद्र कुंडलवाल तसेच संजय विश्वनाथ टेकाडे,सौ शुभांगी विनोद गुजरकर हे निवडून आले नंतर गावातील जनविकास पॅनलने व कार्यकर्त्यांनी निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन व स्वागत केले.विजयी उमेदवार यांनी जनतेचे आभार व्यक्त केले आहे.तसेच विठ्ठलभाऊ मोरे,प्रकाशभाऊ हिरुळकर,अ.शहजाद,अ.खालिक,अमितभाई ठेकेदार,नरेंद्र कुंडलवाल,सुनील बोंडे,अब्दुल ताहीर,सुरेश खंडारे,सय्यद जलालभाई,गजानन थोरात,दिलीप खलोकार,अब्दुलभाई,महादेवराव कथे,दादाराव नाथे,कमर परवेज(मास्तर)अंकुश घारे,निलेश कुरडीवाल,भास्कर गुजकर,ठेकेदार शारीकभाई, पुरुषोत्तम शिंदे,सोळंके,बोरेकर,श्रीनाथ, वसंतराव निमकर,अ.सादिक सै.बिलाल,अ.नासीरखान(अ.रफीक मास्तर)रामचंद्र पारडे,दशरथ पारडे,किरण लाखे,जानराव शेलोकार,राजेश घन,अ.इम्रानभाई,अ.साबिरभाई,जावेदखान,अ.मतीन,अक्षय वाट,सुनील कडू,उत्तमराव गोरले,सरफराजखान,मूकतारखॉ,हरिभाऊ कोकाटे,अडोकार,जाबीरशहा, अ.शरीफभाई,किसनराव पाठक,कैलास शेळके,ऋषिकेश शिंदे,विनोद सूर्यवंशी,बुढाळकर,संजय तेल्हारे,खंडारे,दीपक गुंजकर,रहमतअली,रसूलखॉ,राजुभाई,इनायतअली,सचिन जुनघरे इत्यादींनी अथक प्रयत्न करून वार्ड क्रमांक तीन हा गेले 25 वर्षापासून शिवसेना पक्षाचा बालेकिल्ला समजणारा वार्डात जनतेने भुईसपाट करून विजय प्राप्त केला. जनविकास परिवर्तन पॅनल चा विजय हा खर्या अर्थाने जनतेचा विजय झाल्याचे बोलले जाते.पारंपारिक विरोधी गट एकत्र येऊन सुद्धा,त्यांना मतदारांनी आपली जागा दाखविली आहे