ताज्या घडामोडी

पातुर अकोला मार्गावर महाराष्ट्र गोट फार्म मध्ये बकऱ्यांची चोरी लाखोचे नुकसान

पातुर भागात गुरेढोरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय

अविनाश पोहरे / अकोला एक्सप्रेस न्यूज नेटवर्क, पातूर

पातूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पातुर अकोला मार्गावर असलेल्या महाराष्ट्र गोट फार्म मधून अठरा बकऱ्यांची चोरी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर झाली असून यामध्ये या गोट फार्म धारकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे
या घटनेची तक्रार पातुर पोलिसात तोकीर अहेमद कबीर अहमद यांनी केली आहे या तक्रारीवरून पातुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तोकीर अहेमद कदीर अहेमद यांनी पाच महिन्यापूर्वी समर्थ नगर चे समोर असलेल्या त्यांचे जागेमध्ये गोट फार्म उभे केले आहे या गोट फार्म मध्ये लाखो रुपये खर्चून त्यांनी आफ्रिकन , जमनापरी, गुजरी, लोकवानी, अश्या विविध प्रकारच्या जातीच्या बकऱ्या विकत घेतल्यावर या गोट फार्म मध्ये दुधाचा व्यवसाय सुरू केला होता
हा व्यवसाय भरभराटीस येत असतानाच मंगळवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी चार चाकी वाहन आणून या गोट फार्म मधील अठरा बकऱ्यांची चोरी केली आहे या गोट फार्म मध्ये एकूण 28 बकऱ्या होत्या यामध्ये काही लहान पिल्ले होती अज्ञात चोरट्यांनी छोटी पिल्ले ठेवून मोठ्या बकऱ्यांची व बोकड यांची चोरी केली आहे बुधवारी सकाळी साडेसात वाजता तोकीर यांना चोरी झाल्याची माहिती मिळाली त्यावरून त्यांनी गोट फार्म वर येऊन पाहिले तर अज्ञात चोरट्यांनी गोट फार्म चे पश्चिमेकडून मागील बाजूकडून टिनाचे असलेले पत्रे वाकवून आत मध्ये प्रवेश केला व आतील बकऱ्या इतर सहकारी अज्ञात चोरट्यांच्या सहकाऱ्याने वाहनांमध्ये टाकल्या आणि पसार झाले या पसार झालेल्या अज्ञात चोरट्यांची तात्काळ चौकशी करावी आणि मला न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी महाराष्ट्र गोट फार्म चे संचालक तोकीर अहमद यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे पातूर भागात गुरेढोरे चोरणारी टोळीअसून यामध्ये पशुपालक चिंताग्रस्त झाले आहेत याची प्रशासनाने दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: