तुळजाई हार्डवेअर दर्यापूर येथे उपवधू-वर शुभमंगल परिचय पुस्तिका वितरण सोहळा संपन्न.

डॉ.संदीप सुशीर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
दर्यापूर: माणसंच लय भारी!त्यांनी शुभमंगल पुस्तिकाच आणली तुमच्या,माझ्या दारी या सत्य वाक्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज सेवा समिती अकोट या समितीचे मुख्य संचालक श्री.रामदासजी होपळसर तसेच त्यांचे खांद्याला खांदा लावुन काम करणारे याच समितीमधिल आणखी मान्यवर मंडळी व संचालक हे सर्वजन मिळुन अकोट नगरीत दरवर्षी वधु-वर परिचय मेळावा घेतात या समितीने आता पर्यंत अखंडीत 13 वर्षे समाजाची सेवा केली. व हा यज्ञ या वर्षीही तेवत ठेवण्याचा पुर्ण मानस या समितीने घेतला होता परंतु कोवीड -19 कोरोना या रोगाच्या साथीमुळे सरकारने काही सक्त नियम बनवले व जेथे लोकांची गर्दी असेल अशा कार्यक्रमाला परवानगी नाकारली त्यामुळे हा मेळावा प्रत्यक्षरित्या होऊ शकला नाही.त्यामुळे असंख्य लोकांना या मेळाव्या पासुन दुर रहावं लागल मनाला एक प्रकारची हुरहुर वाटली एवढा मोठा कार्यक्रम होणार नाही म्हणजेस शुभमंगल पुस्तिका पण मिळणार नाही असेच जवळ जवळ सर्वांनाच वाटले होते.पण स्वस्थ बसतील ते होपळ गुरुजीच कसले त्यांच्या डोक्यातुन आयडीयाची कल्पना निघाली की शासन आपणास प्रत्यक्ष मेळावा घेवु देत नाही तर ना सही पण आपण बायोडाटा घेवुन शुभमंगल पुस्तिका तर छपाई करु शकतो.असा विचार त्यांनी आपल्या सहकारी मिञांशी व संचालकांशी बोलुन दाखवला आणी काही क्षणातच या सर्व मान्यवरांनी होकार दिला.काम सुरु झाले पाहता पाहता सुंदर,सुबक,आकर्षक, मनमोहक अशी शुभमंगल पूस्तिका तयार झाली कसलाही बडेजावपणा नाही की कसलीही जाहीरात नाही कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सरकारचे नियम पाळत गर्दि,जमाव न करता अगदी मोजक्या लोकांच्या सानिध्यामध्ये समाजाला हवे असलेल्या या पुस्तिकेचे विमोचन केले.एवढ्यावरच न थांबता या मान्यवर समिती संचालकांनी व आयोजकांनी या पुस्तिकेमधिल एकुण 670 वधु-वरांना त्यांचे गावात किंवा गावा जवळपास जावुन हे पुस्तक मोफत देण्याची घोषणा करीत वधु-वरांना किंवा त्यांचे पालकांना मोफत पुस्तक वाटप कार्यक्रम चालु केला.मागील तिन चार दिवसापासुन बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले या म्हणी प्रमाणे श्री होपळ सर,श्री लाखे सर,श्री नागे सर,व ईतर मंडळी हि पुस्तिका स्वखर्चाने मोफत वाटप करित आहेत.म्हणुनच तर म्हटले आहे या लोकांचे नियोजनच लय भारी।शुभमंगल पुस्तिकाच आणली ना राव त्यांनी आपल्या दारी।या समितीची काम करण्याची पध्दतच लय न्यारी।म्हणुनच धनगर समाज बांधव आहेत यांचे आभारी!
यावेळी तुळजाई हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स दर्यापूर येथे दिनांक 16 जानेवारी2021ला उपवधू-वर व पालकांच्या तसेच धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत शासनाच्या नियमांचे पालन करीत संपन्न झालेल्या वधू-वर शुभमंगल पुस्तिका वितरण सोहळ्यास दर्यापुर तालुक्यातील व अमरावती जिल्ह्यातील समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज सेवा समिती अकोट या समितीच्या सर्व मान्यवरांचे मन:पुर्वक मल्हारमय अभिनंदन व जय मल्हार जयघोषाने मनस्वी आभार तसेच उपवधू-वर शुभमंगल पुस्तिकेस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.