रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पार्टीच्या वतीने नगर परिषद पातूर मधील वंचित लाभार्थ्यांना रमाई आवास घरकुलचा लाभ देण्याची मागणी

अविनाश पोहरे – संपादक
नगर परिषद पातूर हद्दीतील दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन स्तरावर रमाई घरकुल योजना राबविण्यात येत असून पातूर नगर परिषद हद्दीतील वास्तव्यास असणाऱ्या घरकूलाच्या लाभापासून वंचित असणाऱ्या भोगवटदार गेल्या अनेक पिढ्या न पिढ्यापासून वास्तव्यास आहेत,व याआधी सुद्धा असंख्य नगर परिषद पातूर हद्दीतील वास्तव्यास असणाऱ्या भोगवटदार ह्यांना रमाई आवास घरकूल योजनेचा लाभ देण्यात आला आहे.परंतु काही उर्वरित नागरिकांना हेतुपुरस्पर पाने लाभ देण्यासाठी प्रशासनाची नाराजी असून त्यासाठी नगर परिषद पातूर मधील लोकप्रतिनिधीनी बहुमताने घरकुल देण्याचा ठराव 2009 साली मान्य सुद्धा केला आहे.तरीसुद्धा नगर परिषद प्रशासन पातूर ह्यांनी गोर गरीब लाभार्थ्यांना वंचित न ठेवता रमाई आवास योजनेचा लाभ तात्काळ द्यावा अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी पातूर ह्यांना केली मागणी मान्य न केल्यास रिपाई स्टाईलने आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला ह्यावेळी घरकुल लाभापासून वंचित असणारे नागरिक गयाबाई धाडसे,किरण कांबळे,वंदना धाडसे,सुष्मा कांबळे,रेखा धाडसे,बबिता धाडसे,लक्ष्मण अवचार,आदीसह सागर इंगळे,सुरज धाडसे,अमर धाडसे,शुभम धाडसे,शाम कराळे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.