ताज्या घडामोडी

दर्यापुर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींची निवडणूक शांततेत संपन्न

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी

दर्यापूरचे तहसीलदार निवडणूक अधिकारी डॉ.योगेशराव देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनात १५/२/२०२१ ला ५० ग्रामपंचायतची निवडणूक व १८/२/२०२१ला मतमोजणी शांततेच्या वातावरणात पार पडली असून दर्यापूर तालुक्यातील ५० ग्रामपंचायतची निवडणूक जाहिर झाल्यापासून निवडणूक व मतमोजणी होई पर्यंत दर्यापूर तालुक्याचे निवडणूक अधिकारी डॉ.योगेशराव देशमुख साहेब यांनी ग्रा.पं.च्या निवडणूक कार्यकाळात उमेदवारावर बारकाईने नजर ठेवून कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपली सर्व निवडणूक यंत्रना सज्ज ठेवली होती आणि आदर्श आचारसंहितेला कुठेही गालबोट लागू नये आदर्श आचारसंहितेच काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून दर्यापूर तालुक्यात निवडणूक यंत्रणेने मोलाची कामगिरी बजावली.निवडणूक अधिकारी डॉ.योगेशराव देशमुख व त्यांचे सहाय्यक श्री.अरूणराव राजगुरे व निवडणूक कर्मचारी वर्ग यांनी ५० ग्रामापंचायतीची निवडणूक व मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेत.दि.१८जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पासून मतमोजणी प्रकियेला सुरूवात होऊन सायंकाळ पर्यंत निकाल जाहिर झालेत.डॉ.योगेशराव देशमुख साहेब यांनी व त्यांचे सहाय्यक श्री.अरूणभाऊ राजगुरे यांनी नियोजनबद्ध रित्या निकालाची जय्यत तयारी केली होती.ग्रा.पं.च्या निवडणूकीचे निकालाचे दिवशी दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्राम साहेब यांनी सर्व तहसिल परिसरामध्ये पोलीस यंत्रानेचा चोखपणे बंदोबस्त ठेवला होता.
डॉ.योगेशराव देशमुख साहेब निवडणूक अधिकारी यांनी वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकारांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणून तहसिल परिसरात मिडीया कक्षाची चोखपणे व्यवस्था केली होती.पत्रकारांना निकालाचे वृत्तसंकलन करण्यासाठी कोणतीच अडचन जानवली नाही.पत्रकारांची उत्तमप्रकारे व्यवस्था केली होती.त्यामुळे पत्रकार बांधवांनी निवडणूक अधिकारी डॉ.योगेशराव देशमुख साहेब व त्यांचे सहाय्यक श्री.अरूणभाऊ राजगुरे, निवडणूक विभाग नायब तहसीलदार डॉ.कृष्णा गाडेकर साहेब,वरिष्ठ लिपिक वर्षा नवलकर(सुशिर),महसूल सहाय्यक मनोरमा धंदर,तलाठी विजय वाघमारे,शिपाई दीपक पटके,कैलास मलिये,प्रदीप दानडे,शे.आरिफ शे.दीलावर व इतर सहकारी यांनी अहोरात्र निवडणुकीचे काम केले असून यांचे पत्रकार बांधवांनी उत्कंठाने आभार व्यक्त केले.प्रत्येक सर्कल मधील गावांची मतमोजणी ही त्यांचे व निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी बांधवांचे पॅनल कार्यकर्ते व उमेदवारांनी सुद्धा निवडणूक विभागाचे कौतुक केले असल्याचे प्रत्यक्षदर्शी पहावयास मिळाले व निवडणूक व मतमोजणी शांततेत पार पडल्याबद्दल निवडणूक विभागाचे परिश्रम अतिशय मोलाचे आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: