पातुर ते भंडारज या शेत रस्त्याला जिल्हाधिकारी यांची मंजुरी

अविनाश पोहरे – संपादक
पातुर तालुका विकास मंचाने शेतक-यांच्या हितासाठी केलेल्या प्रामाणीक प्रयत्नांना यश मिळाले याचे खुप समाधान आहे – ठाकुर शिवकुमारसिंह बायस
पातुर ते भंडारज या शेत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी पातुर तालुका विकास मंचाच्या वतीने ५ आक्टोंबर २०२० ला बांधकाम सभापती तुळसाबाई गाडगे यांच्या पत्रावर केंद्रीय राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांना निवेदन देण्यात आले होते.मंत्री महोदय यांनी त्यांचे त्याबाबतचे तशे पत्र ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जितेन्द्र पापळकर यांना पाठवले होते.तेव्हा जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समिती अकोला मध्ये हे काम मंजुर करण्याचे आश्वासन दिले होते याबाबत सतत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठपुरावा सुरू होता.त्याप्रमाणे २० जानेवारी २०२१ ला पातुर ते भंडारज या रस्त्यासाठी एक कोटी साठ लाख रूपयांची मंजुरी मिळाली आहे.याचे समाधान पातुर तालुका विकास मंचाला तसेच या शेत रस्त्याच्या आजु-बाजूला ज्यांचे शेत आहे त्यांना वाटत आहे कारण पावसाळ्यात शेताची मशागत किंवा पेरणी करते वेळी खतं बी-बियाणे हे शेतक-यांना आपल्या डोक्यावर घेऊन चिखलातून सर्कसीप्रमाणे कसरत करून त्यांच्या शेत शिवारापर्यंत न्यावे लागायचे आणी इतर वेळेला ही हा रस्ता खुप खराब असतो यातून आता माझ्या शेतकरी बांधवांची लवकरच सुटका होईल व एक चांगला रस्ता त्यांना तयार करून मिळेल असं मत यावेळी ठाकुर शिवकुमारसिंह बायस यांनी व्यक्त केले आहे.यासाठी पातुर तालुका विकास मंचाचे रितेश सौंदळे, गणेश गाडगे,किरण कुमार निमकंडे, योगेश फुलारी,राजेश आवटे,महेश बोचरे, रूपेश फलके, नितीन वानखडे, नितीन खंडारे,विनोद तेजवाल, सचिन परमाळे,विष्णू बंड, सचिन बंड,सोनु परमाळे,डिगांबर आयस्कार,विठ्ठल डिके, ओम् निमकंडे,रवी श्रीनाथ,अतुल बायस, राजू देवकर,इनायत खान,सैय्यद खालेक,लुकमान चिखलिकर,राजू खोकले, शामराव गाडगे, डॉ विलास हिरळकार,स्वप्निल इंगळे , महेश बोचरे,मधुकर राखोंडे,पिंटू बोंबटकार यांचा मोलाचा वाटा आहे.