ताज्या घडामोडी

पातुर-अकोला मार्गावर अपघात टाळण्यासाठी पातुर तालुका विकास मंचाने वळणाच्या मार्गावर लावले रिफ्लेक्टर.

अविनाश पोहरे – संपादक

पातुर-अकोला या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम खुप वेगाने होत आहे.या महामार्गावरील रस्त्याच्या कडेला इंग्रज काळात लावलेली कडू लिंबाची हजारो झाडे होती ती रस्ता रूंदीकरणात कापण्यात आली.रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडे असल्यामुळे वाहनचालकांना या रोडचा अंदाज यायचा,आता वाहनचालक यांना रस्त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे गेल्या काही दिवसात बरेच अपघात होऊन यामध्ये एकाच कुटुंबातील लहान मुले ,वयोवृद्ध व युवक यांनी आपले प्राण गमावलेले आहेत त्यामुळे पातूर तालुका विकास मंच यांनी वळणाच्या रस्त्यावर दोन्ही कडेला रेडियमचे स्टीकर लावून रात्रीच्या वेळेला वाहनांना मार्ग दिसण्याकरिता सोपे जाईल व अपघात टळतील हे धोरण ठेवून कार्य केले आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने तशे कुठलेही उपाय केलेले नाही उदा.रस्त्याच्या दोन्ही बाजुस बॅरीकेटींग,रात्रीच्या वेळेस वाहनाच्या प्रकाशाने चमकणारे रिफ्लेक्टर,विविध सुचनांचे फलक,वळणाच्या ठिकाणी गतिरोधक इत्यादी गोष्टींची कमतरता प्रखर्शाने जाणवते.
यावर सकारात्मक विचाराने प्रेरित होवून व अपघात होवू नये याकरीता पातुर तालुका विकास मंचाच्या वतीने फुलारी पेट्रोल पंप ते नानखेड फाटा पर्यंत रेडीयम लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.जेणेकरून वाहनचालक यांना वाहन चालवतांना मदत मिळेल त्यामुळे वाहनांचा अपघात होवून कुणी मृत्यूमुखी पडणार नाही.
याप्रसंगी पंचायत समिति पातुरचे माजी सभापती बालूभाऊ बगाडे,महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे,पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस,युवासेना शहर प्रमुख योगेश फुलारी,पातुर शहर भाजपा उपाध्यक्ष गणेश गाडगे, सामाजिक कार्यकर्ते दिनेश गवई, द प्रोफेशनल करिअर अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष पंकज पोहरे,विलास हिरळकार, नितिन वानखडे, अजित आल्हाट,पत्रकार रामेश्वर वाडी, आणी नुकतेच अकोला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झालेले किरण कुमार निमकंडे व आदी मान्यवर उपस्थीत होते.

मागील काही दिवसापासून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण खुप वाढले आहे.लहान मुलांपासुन जेष्ठ नागरिक अपघातात दगावले आहे.त्यांच्या घरी सांत्वना करण्यासाठी गेलो असता त्यांची परीस्थिती खुप बिकट असल्याचे लक्षात आले.ही परिस्थिती अन्य कुणावर परत ओढवू नये यासाठी स्वखर्चातून हा छोटासा प्रामाणीक प्रयत्न केला आहे. – ठाकुर शिवकुमारसिंह बायस

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: