जिल्हास्तरीय उत्कृष्ट महिला कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ. स्मिता लांडे यांची निवड
अजय चोथमल प्रतीनीधी मेडशी
दि. 26. उत्कर्ष महिला प्रतिष्ठान रिसोड द्वारा संचालित स्व. पुंडलिकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय येथील सहा. प्रा. डॉ. स्मिता लांडे यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत वाशिम जिल्हा उत्कृष्ट महिला कार्यक्रम अधिकारी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
गवळी कला व विज्ञान महाविद्यालयातील सहा प्रा डॉ. स्मिता लांडे वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असून मागील चार वर्षापासून रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी चा कार्यभार अतिशय उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. गेल्या चार वर्षात त्यांनी रासेयोच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम व उपक्रम राबविले आहेत. रासेयो नियमित कार्यक्रम व विशेष शिबिरामध्ये त्यांनी रासेयो स्वयंसेवकां सोबत श्रमदान, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्सुकतेने आयोजन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डब्ल्यू. के. पोकळे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एन. लोहिया, प्रा. श्रीकांत कलाने सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. डॉ. स्मिता लांडे यांचे या ऊपलब्धी साठी अभिनंदन व कौतुक केले.











