ताज्या घडामोडी

सौ.शारदाताई ढोमने यांची धनगर धर्मपीठाच्या महिला राज्याध्यक्ष पदी निवड

डॉ.संदीप सुशिर
अमरावती जिल्हाप्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यामध्ये धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांपेक्षा अधिक असून संस्कृती संगोपन व संस्कारक्षम पिढी निर्मितीमध्ये महत्त्वाचा रोल महिला करत आहेत.त्यामुळे धनगर धर्मपीठाची महिला कार्य कारिणी असणे गरजेचे व आवश्यक आहे.
सौ.शारदाताई ज्ञानेश्वर ढोमने अमरावती ह्या धार्मिक क्षेत्राबरोबर महिला शिक्षण, संघटन,आरोग्य वगैरे विषयात काम करत असून महाराष्ट्रभर महिलाच्या प्रबोधनात काम करत आहेत.त्यांचे संघटन कौशल्य व समाजकार्य उत्कृष्ट आहे. धनगर समाजजोडो अभियानात सुद्धा त्या सक्रिय असून नुकतीच उज्जैन येथे शिबिराला उपस्थित राहून आलेल्या आहेत.सौ.शारदा ढोमने यांना धनगर धर्म पीठाच्या महिला विंगची जबाबदारी दिल्यामुळे त्या महाराष्ट्रभर समाजातील धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचे संघटन करतील असा विश्वास आहे.सौ.शारदा ढोमने यांची धनगर धर्मपीठाच्या महिला शाखेच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची शिफारस धनगर धर्मपीठाचे विदर्भ अध्यक्ष विनायक काळदाते व विदर्भ धर्म गुरू प्रभाकररावजी दिवनाले यांनी केली व धनगर धर्मपीठाच्या राज्य शाखेने त्याला मान्यता दिली.
सौ.शारदाताई ढोमने यांची धनगर धर्मपीठाच्या महिला राज्यअध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे सर्व धनगर समाज बांधव तथा भगीणींना आनंद झाला असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: