‘पसायदानामृत’ मासिकाच्या दिवाळी अंक प्रकाशनाचा सोहळा संपन्न
किरण कुमार निमकंडे
संपादकीय सदस्य अकोला एक्सप्रेस न्यूज पातूर
संत साहित्याला वाहिलेले आणि अध्यात्मिक उंची गाठलेले पसायदानमृत मासिकाने गेल्या पाच वर्षापासून आध्यात्माची आवड असणाऱ्या आणि संत साहित्यात रस असणाऱ्या वाचकांना दर्जेदार साहित्याची मेजवानी दिली आहे सदर मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशनाचा सोहळा चिन्मय मिशन अकोला येथे दि २०/११/२०२० ला सानंद संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चिन्मय मिशनचे आ.रा तिडके होते पसायदानामृतचे संपादक प्रा.सुरेश कुलकर्णी, विजयराव चोपडे, प्रा.यादवराव वक्ते,बाबा जोशी मधुकरराव शंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
अनंत कुलकर्णी चिन्मय मिशनचे कर्मचारी महादेवराव यांनी कार्यक्रमाचे यशस्वितेकरिता प्रयत्न केले अल्पोपहारानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी कोरोना सुरक्षा नियमावलीचे कटाक्षाने पालन करण्यात आले.










