सामाजिक बांधिलकी ची परंपरा कायम
नितिन हुसे
तालुका प्रतिनिधी बाळापूर
वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून एका गरीब कुटुंबाची दिवाळी केली साजरी .दरवर्षी प्रमाणे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुठलाही अनाठायी खर्च न करता तो पैसा समजासेवेत उपयोग करून घेणारा एका ध्येयवेड्या शिक्षकाने एका संपूर्ण कुटुंबाला कपडे देऊन केला वाढदिवस साजरा .राजेश रामरतन दिवनाले रा. मनारखेड शिक्षक संत गजानन इंग्लिश मिडीयम स्कूल,पारस.गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचा वसा घेतलेल्या या शिक्षकाने आज पर्यंत ही आपला वाढदिवस कुठल्याही थाटामाटात न करता अगदी साधेपणाने साजरा केल्या जातो.दरवर्षी गरीब गरजू विद्यार्थ्यांना कधी पुस्तके, लेटर बुक,तर कधी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मुलांना स्वेटर तर ब्लेंकेट वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला आहे .अश्याच प्रकारे एका मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबाची एक प्रकारे दिवाळी साजरी केली.कारण हात मजुरी करून मुला बाळांचे संगोपन करणे फार कठीण आहे ही बाब लक्षात घेऊन त्यांना मदत केली यावेळी त्या मुलींच्या चेहऱ्यावरचे हास्य व समाधान हेच माझ्यासाठी आयुष्याची मोलाची शिदोरी आहे . मदत केलेल्या कुटुंबात दशरथ सुरूषे त्यांची पत्नी व 4 मुली असे एकूण 6 लोकांचे कुटुंब आहे.अश्या या सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे हे शिक्षक स्वतः समाजसेवेची सुरुवात करून समाजातील लोकांना इतर गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन करत असतात. त्या कुटुंबाला कपडे वाटप करत असताना गावातील प्रतिष्ठित नागरिक रवींद्र शेळके ,दिलीप डंबेलकर ,युवा सामाजिक कार्यकर्ता विकी नागे उपस्थित होते.










