ताज्या घडामोडी

तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.१०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

अजय चोथमल प्रतीनीधी मेडशी दि. 25

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी संत शिरोमणी श्रद्धेय श्री. डॉ.रामराव महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस, जनसेवा संघ पोहरादेवी, रामराव बापू युवा संघटना पोहरादेवी, दादा ग्रुप पोहरादेव, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल पोहरादेवी, ज्योतिबा मंडळ वसंतनगर, दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तथा एकनिल ब्लड बँक यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरामध्ये १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धेय रामराव बापू यांना आदरांजली वाहिली.
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून समाजासाठी आपल्यालाही काही देनं लागतं या सामाजिक जाणिवेतून या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे गौरव घुगे या युवकाच्या काकाचे नुकतेच निधन झालेले असुन सुद्धा सामाजिक बांधिलकी जोपासून गौरव घुगे या युवकाने रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी शर्तीचे प्रयत्न केले .
त्याच्या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
शिबिराचे उद्घाटन महंत श्री.बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले .
याप्रसंगी आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत रोकडे सर एम एस सर्जरी, डॉ.अल्फा प्रशांत रोकडे, एकनिल ब्लड बँकेचे सागरभाऊ तोडकर, माजी सरपंच विजय पाटील, महंत जितेंद्र महाराज गावातील प्रतिष्ठित मंडळी तथा शेकडो युवक उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटात सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रस चे व्यवस्थापकिय संचालक डॉ. प्रशांत रोकडे, प्रशासकीय संचालक डॉ. संदीप दुधे, संचालक डॉ. श्याम जाधव ( नाईक ) संचालक डॉ. आशिष शेजपाल, संचालक डॉ. श्रीकृष्ण पाटील यांनी अभिनंदन केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: